Give justice to grain shopkeepers – MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रातील अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरु केला असून आज दि. 21 ऑगस्ट रोजी रास्त धान्य दुकानदारांच्या समस्यांसंदर्भात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी 80 कोटी नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये पाच वर्षांकरीता मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. परंतु हे धान्य ज्या दुकानदारांच्या माध्यमातून नागरीकांपर्यंत पोहचविण्यात येते त्या दुकानदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयातील रास्त धान्य दुकानदार संघटनेने खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांची भेट घेत आपल्या समस्यांचे निवेदन दिले. यावर आपण तोडगा काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. Give justice to grain shopkeepers
त्या समस्ये संदर्भात खासदार धानोरकर यांनी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांची भेट घेऊन रास्त भाव दुकानदारांच्या समस्या संदर्भात चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने वादवा आयोगाच्या शिफारशीनुसार 460 रु. प्रति क्विंटल कमीशन करणे, 4G ई-पास मशिन यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कायमस्वरुपी सोडविणे, वरोरा तालुक्यातील दुकानदारांचे कमीशन चे पैसे तात्काळ देणे व ऑफलाईन धान्य वाटप संदर्भात सर्व मागण्यांवर मंत्री महोदयांसोबत चर्चा केली. Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal
या सर्व समस्या लवकरच सोडविणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.