Thursday, April 24, 2025
HomeAccidentनुकसानग्रस्ताना तात्काळ नुकसान भरपाई द्या

नुकसानग्रस्ताना तात्काळ नुकसान भरपाई द्या

Give immediate compensation to the victims whose houses have entered water due to rain – Vanchit Bahujan Aghadi demands

चंद्रपूर :- मागील महिन्यात संततधार आणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून घरातील अन्नधान्य व इतर साधन सामुग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानग्रस्ताना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी VBA वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांनी चंद्रपूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. >> शिवरायांच्या अवमान प्रकरणी कठोर कारवाई करा

जुलै महिन्यात सर्वदूर मोठया प्रमाणात पाऊस पडला तसेच चंद्रपूर जिल्ह्यासह चंद्रपूर तालुक्यात सुद्धा पावसाने कहर केला, या दरम्यान पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरले, काहींचे घरं खचले, अनेकांची अन्न धान्य, घरातील मौलव्यान वस्तू, तसेच गुरे ढोरे यांची मोठया प्रमाणात हानी झाली होती.>> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ना. मुनगंटीवारांना फोन

शासन स्तरावर पंचनामे होऊन, एक महिन्यावर अवधी निघून सुद्धा नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई मिळाली नाही, करिता चंद्रपूर तालुक्यातील नागरिकांना तसेच पडोली आमटा वासिय नुकसान ग्रस्ताना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांनी तहसीलदार विजय पवार यांना निवेदनाच्या माध्यमातून केली. राज्य सरकार व कंगना रानौत चा युवक काँग्रेस ने केला निषेध

यावेळी अरविंद बावणे, महेश आवळे, नत्थुजी निखाडे, रवींद्र शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular