Saturday, April 26, 2025
HomeCrimeडोळ्यात मिरची पावडर फेकून पळविले 17 लाख

डोळ्यात मिरची पावडर फेकून पळविले 17 लाख

Game of two brothers was foiled by the Chandrapur police

चंद्रपूर :- भंगार व्यावसायिकाचे सतरा लाख रुपये त्याचा काम करणारा नौकर घरी पोहचवताना काही अज्ञाताने त्याचे डोळ्यात लाल मिरची पावडर फेकून त्याचे जवळील 17 लाख रुपये जबरी हिसकावून नेणाऱ्या घटनेचा चंद्रपूर शहर पोलीसांनी केलेला तपास चक्क करणारा ठरला….
यात चंद्रपूर शहर पोलीसांनी दोन सख्खे भाऊ रफिक शेख रज्जाक शेख (35 वर्ष) व शफिक रज्जाक शेख (32 वर्ष) दोघेही रा. रहमत नगर, चंद्रपूर यांना अटक केली आहे. 17 lakhs and ran away with chili powder in his eyes

चंद्रपूर शहरातील घूटकाळा वार्डातील, आंबेकर लेआऊट येथील भंगार व्यावसायिक हबीब मेमन यांनी काम करणाऱ्या नौकराला सुपरवायजर कडून 17 लाख घेऊन त्याचे घरी पोहचविण्यास सांगितले दरम्यान काम करणारा रफिक शेख याचे डोळ्यात कोणीतरी लाल मिर्ची पावडर फेकून त्याचे जवळील 17,00,000 रुपये जबरी हिसकावून पळविल्याचे त्याने मालक भंगार व्यावसायिक मेमन यांना सांगितले यावरून हबीब मेमन यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चंद्रपूर शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने तपास सुरु करीत घटनास्थळ गाठत तपास सुरु केला.
घटनास्थळी पोलिसांनी रफिक शेख याला बोलावून घडलेला घटनाक्रम फिरवून – फिरवून विचारला असता त्याच्या सांगण्यात पोलिसांना संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी पोलीसीखाक्या दाखवला असता त्याने स्वतःच लहान भावासोबत हे कृत्य केल्याचे सांगितले, त्याने लहान भावासोबत मिळून स्वतःच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून 17,00,000 रुपये चोरल्याची कबुली दिली. Game of two brothers was foiled by the Chandrapur City police
यावरून चंद्रपूर शहर पोलिसांनी रफिक शेख (35 वर्ष) व शफिक शेख या दोघा भावांना अटक करून चोरलेली 17,00,000 रुपये रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी, दोघांचे 2 मोबाईल असा एकूण 17,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी संदीप बच्छीरे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन सुमक्का, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके यांचे नेतृत्वात पोउपनि संदीप बच्छीरे, पोहवा सचिन बोरकर, संतोषकुमार कणकम, भावना रामटेके, कपुरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम , रूपेश रणदिवे, राहुल चितोडे, इर्शाद खान, विक्रम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular