Saturday, April 26, 2025
HomeAgricultureकोलगांव वासियांकडून हंसराज अहीर यांचा भव्य नागरी सत्कार

कोलगांव वासियांकडून हंसराज अहीर यांचा भव्य नागरी सत्कार

Hansraj Ahir felicitated by Kolgaon residents

चंद्रपूर :- बल्लारपूर नॉर्थ वेस्ट प्रकल्पातील, कोलगांव येथील सर्व उर्वरित जमीन प्रकल्पग्रस्तांचे वतीने शेतकऱ्यांचे  कैवारी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांचा भव्य नागरी सत्कार दि. 17 मार्च रोजी संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार अॅड. संजय धोटे व सुदर्शन निमकर, वाघुजी गेडाम, राजु घरोटे, कोलगावच्या सरपंच अनिताताई पिंपळकर, उपसरपंच पुरूषोत्तम लांडे, मधुकर नरड, अरूण मस्की, संजय पावडे व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

  धोपटाळा भुमिगत ते खुली खाण प्रकल्पाकरिता ८१० हेक्टर जमीन अधिग्रहीत झाली. ज्यामध्ये धोपटाला, सास्ती, भडंगपूर सह कोलगांव येथील जवळपास २४५ हेक्टर जमीन अधिग्रहण झाली. परंतु उर्वरित ३३७ हेक्टर जमीन शिल्लक राहिली होती व मुळ प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पातील डम्पिंग व वर्धानदी लागून असल्यामुळे वारंवार निर्माण होणारी पूर परिस्थिती यामुळे उर्वरित जमिनीवर शेती करणे हे केवळ अशक्य होणार होते आणि गावकऱ्यांनी सुध्दा ही गोष्ट संभाव्यतः प्राणहानिकारक ठरणारी होती. विद्यमान उपसरपंच पुरूषोत्तम लांडे व सर्व गावकऱ्यांनी अहीर यांचे समक्ष ही समस्या उपस्थित केली व उर्वरित शेतीचे अधिग्रहण व गावाचे पुनर्वसन या दोन्ही समस्या अतिशय ताकदीने लावून धरल्या.
  अहीर यांनी उर्वरित शेतजमिनीच्या समस्येला व भविष्यात गावकऱ्यांच्या जीविताला होणारा संभाव्य धोका ओळखून तात्काळ वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. धोपटाला भुमिगत खाण व खुली खाण हा मुळ प्रकल्पच सेक्शन-९  होऊनही व्यवहार्य ठरत नसल्यामुळे खुप मोठी अडचण या प्रकल्पात आणि गावासाठी निर्माण झाली होती. परंतु, शेतकऱ्यांचे खरे कैवारी असलेले अहीर यांनी कोल मंत्रायल, कोल इंडिया, वेकोलि मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालय या स्तरावर वारंवार बैठका घेऊन, कॉस्ट प्लसच्या कारणाने अडकलेला मूळ प्रकल्प वेकोलि बोर्डातून पास करवून घेतला. त्यातील आर्थिक मोबदला, नोकरीचे फायदे या गोष्टी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या व सोबतच उर्वरित कोलगाव जमीन अधिग्रहण व गाव पुनर्वसन या विषयासाठी पण सतत वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन बल्लारपूर नॉर्थ वेस्ट या प्रकल्पात ३६० हेक्टर अधिग्रहीत जमिनीत कोलगाव येथील ३३७ हेक्टर जमीन  घेण्यास वेकोलिस भाग पाडले.
   या भीष्म कार्यासाठी कृतज्ञ शेतकऱ्यांनी अहीर यांचा गावात भव्य मिरवणूकीसह, नागरी सत्कार करून शेतकऱ्यांचा प्रतिक असलेला चांदीचा नांगर, शाल, श्रीफळ आणि भव्य हार घालून सत्कार केला. यावेळी प्रास्ताविकातून कोलगावचे उपसरपंच पुरूषोत्तम लांडे यांनी समस्त गावकऱ्यांसमोर काही वर्षांपूर्वी प्रतिपादन केल्यानुसार, मुळ प्रकल्प यशस्वी करणे, उर्वरित जमीन अधिग्रहण करणे, गावाचे पुनर्वसन करणे या संपूर्ण कार्यासाठी गावाचे वतीने कृतज्ञता व्यक्त केली. Farmers should cultivate agriculture, honor of being a farmer
      अहीर यांनी यावेळी, मागील २५ वर्षांपासून आपण सतत शेतकऱ्यांसाठी मैदानात असून, भविष्यात देखील पूर्ण ताकदीनिशी पाठीशी राहण्याचे उद्घोषित केले तसेच या जमिनी आपण वडीलोपार्जितरित्या कसत आलेलो आहोत, आपणापैकी कोणीही व्यापार किंवा सावकारी पध्दतीने जमिनी हडपून मालक झालेलो नाही, आपणासर्वांची नाळ जमिनीशी जुळलेली आहे त्यामुळे आपण खरे शेतकरी असल्याचा अभिमान बाळगून गावकऱ्यांनी जरी संपूर्ण शेती अधिग्रहीत झाली असली तरी शेतकरी पुत्रांनी आपले शेतीचे कौशल्य लोप न पावण्यासाठी अधिग्रहणातून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात दुसरीकडे शेती घेवून शेतकरी असल्याचा सन्मान बाळगावा व कृषीप्रदान देशाची सर्वथा सेवा करावी. भविष्यात अधिग्रहीत जमिनींसाठी वाढीव दर मागण्याचे सुतोवाच सुध्दा अहीर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रदीप बोबडे यांनी केले तर यावेळी अॅड. प्रशांत घरोटे व माजी आमदारद्वय अॅड. संजय धोटे व सुदर्शन निमकर यांचे सत्कारपर भाषण झालीत.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular