Forensic investigation to be conducted into the cyber scam at CDCC Bank
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल २.९३ कोटींचा सायबर घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, या प्रकरणाची तातडीने फॉरेन्सिक चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी केली होती. याबबत त्यांनी पोलिस महासंचालकांना निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत पोलिस महासंचालकांनी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. Cyber scam at CDCC Bank
दिनांक ७ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सायबर हल्ल्यातील गैरव्यवहारामुळे एकूण ₹३.६० कोटींच्या व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात केवळ ₹९० लाखांची रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित २.९३ कोटींची रक्कम अद्यापही गहाळ आहे. यामध्ये बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी विभागप्रमुख, संगणक सहाय्यक तसेच सायबर सिक्युरिटी पुरवठादार यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. Forensic investigation to be conducted into the cyber scam at CDCC Bank
विशेष म्हणजे, बँकेने सायबर सुरक्षिततेसाठी तब्बल १०० कोटींचा खर्च दाखवूनही कोणतीही ठोस सुरक्षित व्यवस्था न ठेवता, विमा संरक्षणही घेतलेले नव्हते. इतकेच नव्हे, तर न्यायालयीन परवानगी न घेता ग्राहकांची रक्कम नफ्यातून परत करून बँकेने न्यायप्रक्रियेचाही अवमान केला आहे. letter from the Director General of Police reached the Superintendent of Police’s office

