Groundbreaking ceremony for the construction of a library building at Nandaphata
चंद्रपूर :- कोरपणा तालुक्यातील मौजा नांदाफाटा येथे आज प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत मंजूर झालेल्या १.५० कोटी रुपयांच्या सार्वजनिक वाचनालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत नांदा व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी उत्साहात पार पडले.
वाचनालय इमारतीच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना वाचनासाठी एक आधुनिक व सुसज्ज सुविधा मिळणार आहे. स्थानिक पातळीवर शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे मत यावेळी भाजपा तालुका महंमत्री सतीश उपलेचंवार यांनी व्यक्त केले. Groundbreaking ceremony for the construction of a library building at Nandaphata
हे वाचनालय ग्रामस्थांसाठी ज्ञानसंपादनाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य जागा मिळेल, तर गावातील नागरिकांसाठीही विविध माहिती व शिक्षणसाधनांचा उपयोग करता येईल. खनिज संपत्तीच्या उपयोगातून स्थानिक पातळीवर अशा प्रकारचा विकास होणे, ही खरोखरच प्रेरणादायक गोष्ट आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भा.ज.पा. कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, तालुका अध्यक्ष संजय मुसळे, नांदा उपसरपंच पुरषोतम आस्वले, ग्रापं पंचायत सदस रत्नाकर चटप, अभय मुनोत, संजय नित, लहुजी गोंडे, रविकुमार बंडीवार, सुजित ठाकूर , जतीन राठोड, जगदीश नावंधर, दिलीप थेठे, हारून सिद्दीकी, कैलास ताकसांडे, संजय कोवे, प्रदीप कल्लूरवार, रामदास जोगी, सतीश जमदाडे ,मारोती बुडे, प्रदीप काळे, सौं. अशा खासरे, सौं मंगला लोणारे, सौं संगीता चौधरी, सौं जयश्री ताकसांडे, सौं शालिनी तुराणकर, सौं वंदना बढोले व यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.