Saturday, January 18, 2025
HomeAssembly Electionसुगंधित तंबाखू ने भरलेला ट्रक जिल्हा सीमेवर जप्त

सुगंधित तंबाखू ने भरलेला ट्रक जिल्हा सीमेवर जप्त

Truck loaded with flavoured tobacco seized at district border

चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर गडचिरोली मार्गांवरील व्याहाड खुर्द येथील आंतरजिल्हा बॉर्डर येथे लावण्यात आलेल्या एस.एस.टी चेक पोस्टवर महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधित तंबाखुने भरलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB च्या पथकाने जप्त करीत एकुण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Truck loaded with flavoured prohibited tobacco seized at chandrapur district border

आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी मा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे आदेशान्वये विधानसभा निवडणुक -2024 चे आदर्श आचारसंहितेच्या Code of Conduct अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात दारूबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी पोलीस स्टेशन सावली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, एक पांढरे रंगाचा आयसर कंमाक सीजी 07 सीक्यु 4602 मधुन महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तम्बाकु व पानमसाला या अन्नपदार्थाच्या विकीकरीता गडचिरोली ते चंद्रपूर अशी अवैद्यरित्या वाहतुक करणार आहे या माहितीवरून एसएसटी चेक पोस्ट व्याहाड (बुज) ता. सावली येथे भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, महेश कोंडावार पोलीस निरीक्षक, सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर आदी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर येथील कर्मचारी यांचेसह नाकाबंदी करून नमुद वाहन चेक केले असता त्यामध्ये लोखंडी तारेच्या बंडल खाली लपवुन ठेवलेला प्रतिबंधीत मजा 108 सुंगधित हुक्का शिशा तंबाखूचे 200 ग्रॅम वजनाचे 1680 बॉक्स, 50 ग्रॅम वजनाचे 1800 बॉक्स एकूण कि. 19,93,800 रुपये व जप्त वाहन ट्रक 15,00000 रुपये असा एकूण 34,93,800 रुपयांचा मुद्देमाल पंचनामा कार्यवाही करून जप्त करण्यात आला. यात आरोपी वाहन चालक इरफान कुरेशी मुस्तफा कुरेशी (27वर्ष) रा. इस्लामनगर वॉर्ड, सुफेला, ता. भिलाई, जि.दुर्ग, छत्तीसगड व संतोष कुमार सुंदर सिंह (47 वर्षे) रा.पयली, ता. शहपुरा, जि. डिंडोरी, मध्यप्रदेश यांचेविरूध्द पोलीस स्टेशन सावली येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधि. 2006, सहकलम 223, 275, 123 भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Chandrapur Local Crime Branch seizes goods worth Rs 35 lakhs in blockade

सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि दिपक कांकेडवार, स्था.गु.शा चंद्रपूर हे करीत आहे.

सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, भगत उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्था.गु.शा चंद्रपूर, सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा चेतन गज्जलवार, नितेश महात्मे, किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, प्रमोद डंबारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular