first anniversary of the Sarva Dharma Samabhav Prabhu Seva Sanstha was celebrated with enthusiasm
चंद्रपूर :- सर्वधर्म समभाव प्रभू सेवा संस्था, चंद्रपूर या सामाजिक सेवाभावी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन दिनांक ८ जुलै रोजी डेबू सावली वृध्दाश्रम, देवाडा येथे मोठ्या उत्साहात व स्नेहपूर्वक वातावरणात पार पडला. first anniversary of the Sarva Dharma Samabhav Prabhu Seva Sanstha
ही संस्था विशेषतः अंध, अपंग, मानसिक आजाराने ग्रस्त मनोरुग्ण, रस्त्यावर अन्न-पाण्याविना फिरणारे निराधार, शारीरिक दुर्बलतेमुळे समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेलेली माणसं यांच्यासाठी कार्यरत आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना गरजेनुसार अंघोळ घालून स्वच्छ करणे, केस कापणे व दाढी कापणे, स्वच्छ कपडे आणि पादत्राणे देणे, गरज असल्यास वैद्यकीय उपचार करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्नदान, अशा प्रकारच्या निःशुल्क सेवाभावी उपक्रमांद्वारे संस्थेचे कार्य अखंड सुरू आहे. Social Work
छापा मारून अवैध डिझेल साठा जप्त
संस्थेचा उद्देश केवळ सेवा नव्हे, तर मानवतेचा खरा अर्थ जगण्यातून दाखवणे आहे. माणसाला माणूस म्हणून जगवण्याचा दृष्टिकोन आणि आपलेपणाचा जिव्हाळा देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जातो.

