Thursday, October 30, 2025
HomeAccidentकापनगाव महामार्गावरील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत

कापनगाव महामार्गावरील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत

Financial assistance to accident victims on Kapangaon highway

चंद्रपूर :- राजुरा-गडचांदूर मार्गावर दि. 28 ऑगस्ट रोजी हायवा ट्रक व प्रवाशी ऑटोच्या भीषण अपघातात खामोना व पाचगाव येथील 6 प्रवाशांचा दुदैवी मृत्यु झाला होता. त्या अपघाताच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी दि. 29 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय, राजुरा येथे बैठक घेवून तहसिलदारांना मृतक व जखमींच्या कुटूंबियांना तात्काळ आर्थिक साह्य देवून जखमींवर प्रभावी उपचार करण्याची सुचना केली. Financial assistance to accident victims on Kapangaon highway

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे आर.पी.सिंग यांचेशी दुरध्वनी वरून संवाद साधत अपघातग्रस्त महामार्गाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना पिडीत कुटूंबियांना तात्काळ आर्थिक मदतीबाबत सुचना करण्याचे निर्देश दिले.

      सदर बैठकीत मृतकांच्या कुटूंबियास रूपये 4 लाखाची सानुग्रह मदत व अंत्येष्ठीकरिता 10 हजार रूपये तसेच जखमींना 10 हजार व उपचाराचा खर्च ग्रील कंपनीद्वारा देण्यात येणार असल्याचे तहसिलदारांनी सांगितले.

      यावेळी अहीर यांनी मृतकांप्रती संवेदना व्यक्त करीत या आघातातून संबंधित कुटूंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती लाभो अशी भावना व्यक्त केली.

या बैठकीस राजुराचे आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजप नेते खुशाल बोंडे, माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, राजुराचे ठाणेदार परतेकी आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी हंसराज अहीर यांनी जखमींच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular