Organized Fancy Dress Competition at Infant Convent
चंद्रपूर :- इन्फंट् जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे प्री प्रायमरी विभागामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांकरीता फॅन्सी ड्रेस प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. यात पीपल हू हेल्प अस म्हणजे आपले मदतनीस या थिमवर बालगोपालांनी डॉक्टर, शेतकरी, मेकॅनिक, सैनिक, पोलीस, टीचर भाजीपाला विक्रेता, माली (गार्डनर ), एअर होस्टेज, पायलट, आरटीओ इत्यादी भूमिका उत्कृष्टपणे सादर केल्या. Fancy Dress Competition at Infant Convent
यावेळी मुख्यध्यापिका सिमरन कौर भंगू , मुख्यध्यापिका मंजूशा अलोणे यांनी शालेय स्पर्धांकरीता पालक वर्गाकडून मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून कौतुक केले तर कार्यक्रमात उपस्थित पालक वर्गांमधून रामगीरवार मॅडम, ईटणकर मॅडम , तुरणकर मॅडम, सिद्धीकि सर, शेख सर, चन्ने मॅडम यांनी आपले मत व्यक्त करताना अशा प्रकारचे कार्यक्रम मुलांना चालना देणारे असतात, यातून मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे संचालन नीता जक्कनवार यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री झिलपे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्री प्रायमरी विभागातील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



