Discount announced on 16th, 17th and 18th of September regarding the use of loudspeakers and loudspeakers
चंद्रपूर :- केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 रोजीच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादिच्या वापराबाबत श्रोतगृहे, सभागृह सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष या सारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्हयाच्या निकडीनुसार, सवतल जाहीर करण्याकरीता, जिल्हा दंडाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. Exemption announced for the use of loudspeakers
त्यानुसार, ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष या सारख्या बंद संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन 2024 मधील 10 सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आलेले असून 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.
त्याप्रमाणे 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद, 17 सप्टेंबर रोजी अनंत चर्तुदशी आणि 18 सप्टेंबर रोजी गणेश उत्सव, मुर्ती विसर्जन करीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सवलत जाहीर करण्यात आली आहे. सदर सवलत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लागू राहील.
18 सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिकारी यांच्याकडून परवानगी घेवूनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक चा वापर करता येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.