Thursday, April 24, 2025
HomeBudgetपेन्शन राज्य अधिवेशनाला गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेचा पाठिंबा

पेन्शन राज्य अधिवेशनाला गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेचा पाठिंबा

Support of Gondwana University Young Teachers Association for Pension State Convention

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे पेन्शन राज्य महाअधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे. या महाअधिवेशनाला गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने जाहीर पाठिंबा दर्शवलेला असून संघटनेच्या सभासदांना या महाअधिवेशनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे.

यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोर्लावार यांनी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेला पत्र देऊन पाठिंबा घोषित केलेला आहे. Support of Gondwana University Young Teachers Association for Pension State Convention

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन सदैव जुन्या पेन्शन लढ्यात सक्रिय सहभागी झाली असून याआधी संघटनेच्या वतीने जुन्या पेन्शन यात्रेला, अधिवेशनाला व संघर्षाला कायम पाठिंबा व सहभाग देण्यात आलेला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे आयोजित अहिल्यादेवी नगर शिर्डी येथील 15 सप्टेंबर 2024 ला संपन्न होणाऱ्या पेन्शन राज्य अधिवेशनाला गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेने आपला जाहीर पाठिंबा व सक्रिय सहभाग देत संघटनेच्या सभासदांना अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular