My effort for women empowerment- MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून प्रत्येक क्षेत्रात त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहीली आहे. मी एक महिला खासदार म्हणून माझ्या लोकसभा क्षेत्रातल्या प्रत्येक महिलेचे सक्षमीकरणाकरीता प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी वरोरा व भद्रावती येथे आयोजित तालुकास्तरीतय काँग्रेस कमेटीच्या महिला मेळाव्यात केले. Women’s meeting at Varora-Bhadravati
माझ्या विजयात महिलांचा मोठा वाटा असल्याने माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांच्या सक्षमीकरणाकरीता मी प्रयत्न करणार आहे.
वरोरा तालुका व शहर कॉग्रेस च्या वतीने दि. 03 ऑक्टोंबर 2024 रोजी सिध्दीविनायक सभागृह वरोरा येथे तर भद्रावती तालुका व शहर कॉग्रेस च्या वतीने 04 ऑक्टोंबर 2024 रोजी सेलिब्रेशन हॉल भद्रावती येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
माझ्या रुपाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात पहिली महिला खासदार म्हणून मला मान मिळाला यापुढे राजकारणासह सर्व क्षेत्रात महिलांनी सहभाग घ्यावा, असे देखील मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा साडी देऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्र पुनःश्च एकदा काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणून आणण्याचा संकल्प देखील केला गेला.
यावेळी मंचावर पोलिस उपविभागीय अधिकारी नयोमी साठम, काँग्रेस नेत्या कुंदाताई जेनेकर यासह तालुकाध्यक्ष सोबतच महिला पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.