accused in the Korpana case will be punished severely – Chitra Wagh
चंद्रपूर :- जिल्ह्यातील कोरपणा येथे सहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली.
आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी कोरपणा पिडीत्याच्या कुटुंबाची सांत्वना भेट घेत सखोल चौकशी केली. Chitra Wagh, BJP Mahila Aghadi state president अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड
त्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी पळून जाणाऱ्या आरोपीला अकोला येथून अटक केल्याने महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याच तसेच चंद्रपूर पोलिसांच कौतुक करीत आरोपी अमोल लोडे ला पळून जाण्यास काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी मदत केल्याचा आरोपही लावला. चित्रा वाघ यांची चंद्रपुरात पत्रपरिषद
बदलापूर प्रकरणात विरोध करणाऱ्या काँग्रेस, शिवसेना व इतर विरोधी पक्षाच्या महिलांनी जो विरोध दर्शवला तो विरोध किंव्हा विरोध प्रदर्शन कोरपणा अत्याचार प्रकरणात दिसले नसल्याचे त्या म्हणाल्या.
लोकसभा क्षेत्रातील खासदार महिला असूनही त्यांनी पुढाकार घेतला नसल्याचा आरोपही त्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांना लगावला तसेच बारामतीच्या सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, सुषमा अंधारे या प्रकरणावर काहीही बोलल्या नाहीत तसेच तासाला ट्वीट करणारे विरोधी पक्षणेते विजय वडेट्टीवार या गंभीर प्रकरणावर चूप का? असा सवालही केला. ब्रम्हपुरी चा विकास बारामती पेक्षा
या प्रकरणात पीडित मुलीच्या कुटुंबियांची तसेच गावाकऱ्यांची भेट घेतली असता एकच नाही तर पुन्हा पीडित मुलींवर अत्याचार झाला असल्याचा संशय चित्रा वाघ यांनी पत्रपरिषदेत सांगितले. कोरपना अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होणार
आरोपी हा काँग्रेस पक्षाचा शहर अध्यक्ष होता तसेच तो राहुल गांधी विचार मंच चा शहर अध्यक्ष होता तर राहुल गांधी यांच्या ‘मोहोब्बत की दुकान’ मध्ये असे चाळे का? असा टोलाही लागवला. चंद्रपूरच्या खासदार गप्प – चित्रा वाघ
या गंभीर प्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे, या प्रकरणात पुन्हा पीडित आहे काय ?, आरोपीला पळून जाण्यास कोणी मदत केली ? याचा तपास पोलीस विभाग करीत आहेत, आणी सरकार ही खंबीर आहे त्यामुळे लवकरच सत्य समोर येईल, आणी आरोपीला कठोर शिक्षा मिळेल अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
