Friday, January 17, 2025
HomeAccidentबाबुपेठ उडान पुलाच्या कामाचा दर्जा निकृष्ट

बाबुपेठ उडान पुलाच्या कामाचा दर्जा निकृष्ट

Quality of work of Babupeth Flyover is poor

चंद्रपूर :- शहरातील बाबुपेठ उडान पुलाचे Babupeth Flyover काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक नागरिक आणि तज्ञांच्या निरीक्षणांतून समोर आले आहे. कामाच्या गुणवत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करण्याच्या घाईत नेत्याच्या सांगण्यावरून प्रशासनाने हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, या प्रक्रियेत बांधकामाचे योग्य मापदंड पाळले जात नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. Aam Admi Party

सध्या सुरू असलेल्या कामात, योग्य दर्जाचे साहित्य न वापरणे, कामाचे नियोजन आणि देखरेख योग्य प्रकारे न होणे यामुळे या उडान पुलाचा भविष्यातील टिकाऊपणा आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांनी वेळोवेळी आपत्ती आणि तक्रारी केल्या असता देखील, संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. Immediately set up a committee and take action – AAP demands

तज्ञांच्या मते, निकृष्ट बांधकामामुळे पुलाचे आयुष्यमान कमी होईल तसेच भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शासनाने केवळ राजकीय फायद्याकरिता तातडीने उद्घाटन करण्याच्या घाईत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम चालू ठेवले आहे.

शहरातील विविध सामाजिक संघटना, तज्ञ आणि नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, पुलाचे काम त्वरित थांबवून त्याच्या गुणवत्तेचे पुनर्मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होणार नाहीत. Quality of work of Babupeth Flyover is poor

बाबुपेठ उडान पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि योग्य उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी आम आदमी पार्टी चे राजु कुडे यांचे नेतृत्वात  जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आप चे वरिष्ठ नेते सुनील देवराव मुसळे, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, महानगर व्यापारी आघाडी अध्यक्ष अलंकार सावळकर, युवा जिल्हा संघटन मंत्री मनीष राऊत, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतूमडे, महानगर महासचिव स्वप्नील घागरगुंडे, महानगर सहसचिव सुधीर पाटील, महानगर वाहतूक आघाडी अध्यक्ष जयदेव देवगडे, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभय्ये, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, युवा जिल्हा आदित्य नंदनवार, सुजाता देठे, करुणा ताई, नजमा बेघ समेत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular