Saturday, January 17, 2026
HomeEducationalइन्फंट च्या विद्यार्थिनीची टेनिस बॉल क्रिकेट मध्ये विभागीय स्तरावर निवड

इन्फंट च्या विद्यार्थिनीची टेनिस बॉल क्रिकेट मध्ये विभागीय स्तरावर निवड

Divisional Level Selection of Infant Girls in Tennis Ball Cricket

चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या विद्यार्थिनींनी मुल येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकाविला असून या संघाची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. Divisional Level Selection of Infant Girls Students in Tennis Ball Cricket

यामध्ये इन्फंट काँन्व्हेंट च्या स्मूर्ती राजूरकर, माही उपरे, हर्षदा डाहुले, संस्कृती देवाळकर, प्रियांशी मंचला, आरोही जीरापुरे, श्रावणी बोबडे, लावण्या लांडे, मनश्री गोणेलवार, दिशा सरदार, तनवी रामटेके, प्रतिज्ञा चौधरी, कायनात शेख, स्वाती सागर या विद्यार्थिनींनीचा समावेश असून त्या विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत पात्र झाल्या आहेत.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, अध्यक्ष अभिजीत धोटे, संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक हर्षल शिरसागर, पुंडलिक वाघमारे यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular