Saturday, January 18, 2025
HomeAssembly Electionजिल्हाधिका-यांचे पोलिसांना तपासणीचे आदेश

जिल्हाधिका-यांचे पोलिसांना तपासणीचे आदेश

Administration rejects 6861 suspicious applications
District Magistrate orders police to investigate

चंद्रपूर :- राजुरा विधानसभा मतदार संघात अज्ञात व्यक्तिंकडून ऑनलाईन पध्दतीने मोठ्या प्रमाणात अर्ज केल्याचा प्रकार निदर्शनास येताच प्रशासनाने याबाबत तात्काळ पाऊले उचलत संशयास्पद असलेले 6861 अर्ज पडताळणी करून नाकारले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी याप्रकरणी पोलिस प्रशासनाला तपासणीचे आदेश दिले आहेत. District Administration rejects 6861 suspicious voters applications

70-राजुरा विधानसभा मतदार संघात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्षाची बैठक घेऊन 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी व 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी राजुरा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात आली. मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांमधून 3 ऑक्टोबर 2024 पासून मोठया प्रमाणात ऑनलाईन स्वरुपात अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या 7334 अर्जांची सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीच्या तहसीलदारांमार्फत तसेच बीएलओ मार्फत सखोल तपासणी करण्यात आली. त्यापैकी 6861 अर्जांमध्ये अर्जदाराचा फोटो नसणे, अर्जासोबत जन्मतारीख व रहिवासीचा पुरावा नसणे, अर्जामध्ये नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तीचा असणे, एकच फोटो एकापेक्षा अधिक अर्जावर असणे, वेगवेगळया नावाने अर्ज करणे, अशा स्वरुपाचे अर्ज निदर्शनास आले. Chandrapur District Magistrate orders police to investigate वरोरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे महत्वाचे आवाहन

सर्व अर्जांची बीएलओ मार्फत पडताळणी करून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदरचे अर्ज नाकारण्यात आले आहे. हे अर्ज Voter Helpline App किंवा NVSP Portal याद्वारे Online स्वरुपात करण्यात आले होते. वास्तविकपणे वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांकरीता मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, नाव कमी करणे, त्यामध्ये बदल करणे याकरीता भारत निवडणूक आयोगामार्फत ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु या सुविधेचा गैरफायदा घेवून काही अज्ञात व्यक्तींनी चुकीचे अर्ज ऑनलाईन भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आ. किशोर जोरगेवार यांना मातृशोक

जिल्हा प्रशासन कटिबध्द : संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीबाबत जिल्हा प्रशासन अतिशय सतर्क असून अचूक, शुध्द, निरोगी आणि सर्वसमावेशक मतदार यादीसाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी म्हटले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular