Friday, January 17, 2025
HomeEducationalस्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या अनुताई दहेगावकर यांच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना शालेय व आरोग्य...

स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या अनुताई दहेगावकर यांच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना शालेय व आरोग्य साहित्य वाटप

Distribution of school and health materials to needy students on behalf of Anutai Dahegaonkar of Snehabandh Charitable Trust.

चंद्रपूर :- आपल्या विविध सामाजिक उपक्रमातून जनहितार्थ कार्य करण्यास सदा अग्रेसर असलेल्या चंद्रपुरातील स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टने Snehabandh Charitable Trust संत चोखामेळा मुलींच्या वस्तीगृहात शालेय साहित्य आणि आरोग्य विषयक साहित्याचे वाटप केले. Distribution of school and health materials to needy students

स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनुताई दहेगावकर यांनी संत चोखामेळा मुलींचे वस्तीगृह चंद्रपूर येथे मुलींना शालेय साहित्य व आरोग्य विषयी साहित्याचे वाटप करण्यात आले.

स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्ट नियमितपणे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असते. स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संत चोखामेळा मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थिनींना शैक्षणिक तथा आरोग्यविषयक मार्गदर्शन स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव अनुताई दहेगावकर Anutai Dahegaokar यांनी केले.

संत चोखामेळा मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थिनींनी स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुताई दहेगावकर यांचे आभार मानले.

शालेय तथा आरोग्य विषयक साहित्य वितरण करण्याच्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता तथा स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव अनुताई दहेगांवकर, सहसचिव कपिलाताई मेश्राम, सुवर्णा खोब्रागडे, रेखाताई बारसागडे तसेच संचालक मंडळाच्या कवाडे मॅडम, नळेताई तसेच वसतिगृहाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular