Urjanagar Gram Panchayat Sarpanch Deputy Sarpanch Disqualified
Excitement in political circles
चंद्रपूर :- ई – निविदेतील अनियमितता आणि ग्रामसभा वेळेवर न घेतल्याप्रकरणी अप्पर आयुक्त नागपूर यांनी UrjaNagar Grampanchayat ऊर्जानगर ग्रामपंचायतच्या सरपंचा व उपसरपंचांना अपात्र ठरविले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Urjanagar Sarpanch Deputy Sarpanch Disqualified
ऊर्जानगर ग्रामपंचायत सदस्य राजकुमार डोमकावळे यांनी ई-निविदा E – Tendering प्रक्रियेतील अनियमितता आणि मे 2022 मध्ये ग्रामसभा घेतली नसल्याचे कारणावरून सरपंचा मंजुषा येरगुडे, उपसरपंच अंकित चिकाटे व तत्कालीन ग्रामसचिव यांच्याविरोधात लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. या तक्रारीत ग्रा.पं.च्या ई-निविदा प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचे नमूद केले होते.
या प्रकरणात ग्रा. पं. अधिनियमा नुसार कार्यवाही करून ग्रामसचिवांना निलंबित करण्याची मागणी केली.
यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली दरम्यान चौकशीत सरपंच, उपसरपंच व सचिव दोषी असून ते कार्यवाहीस पात्र असल्याचा अहवाल जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागपूर विभागाचे अपर आयुक्तांकडे पाठविला.
दरम्यानच्या काळात दोन्ही पक्षाकडून दस्तावेज सादर करण्यात आला. अखेरीस 23 ऑगस्टला अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी जिल्हा परिषदेचा चौकशी अहवाल मान्य ठरवून सरपंचा मंजुषा येरगुडे, उपसरपंच अंकित चिकाटे यांना अपात्र ठरविले आहे. तसेच सरपंच व उपसरपंच यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. Excitement in political circles
सदर निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.