Friday, January 17, 2025
HomeAccidentमटण पार्टीत ग्रामपंचायत सदस्याचा गेला जीव

मटण पार्टीत ग्रामपंचायत सदस्याचा गेला जीव

Death of Gram Panchayat member in Mutton Party:                                            Cancel the candidature of Congress candidate Pravin Kakade

चंद्रपूर.:- विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्यासाठी उमेदवारांकडून मटण – चिकन पार्ट्याचे आयोजन चौफेर सुरु आहे. वरोरा – भद्रावती विधानसभा Varora Bhadrawati Assembly क्षेत्रातील विविध उमेदवार असे आयोजन करत असून अशाच एका उमेदवारांच्या प्रचारार्थ ठेवलेल्या मटण पार्टीत दोन कार्यकर्त्यांचा विहिरीत तोल जाऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवार 10 नोव्हेंबर च्या रात्रौ 9 च्या दरम्यान दुःखद घटना घडली. Death of Gram Panchayat member in Mutton Party

गजानन काळे व त्याचा मेव्हणा अरुण महल्ले असे विहिरीत पडलेले दोन व्यक्ती होते. त्या घटनेत माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य गजानन काळे यांचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या परिवारातील सदस्यांना हा मृत्यू नसून घातपाताची शक्यता वर्तवली आहे. असा आरोप श्रमिक पत्र परिषदेत वरोरा – भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे अपक्ष उमेदवार अतुल वानकर यांनी केला आहे.

काँग्रेसचे समर्थक प्रमोद मगरे यांच्या गिट्टी क्रेशर वर झालेल्या घटनेने तर्कवितर्क लावल्या जात आहे. ही घटना की घातपात, यावर संशय निर्माण होत असून काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण काकडे Congress Candidate Pravin Kakde यांच्या प्रचारार्थ मटन पार्टी आयोजित केली होती. त्यामुळे या पार्टीतील खर्च हा उमेदवाराच्या निवडणुकीची खर्चात समावेश करावा. निवडणूक भरारी पथकाने या संदर्भातील चौकशी करून कारवाई करावी. तसा अहवाल इलेक्शन कमिशनला कळवावा. काँग्रेस पार्टीचे उमेदवार दोषी असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मांगणी केली आहे. Cancel the candidature of Congress candidate Pravin Kakade

मृत्यू पावलेल्या गजानन काळे यांच्या परिवाराला आर्थिक मदत आयोजकाकडून करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

गजाननला पत्नी, आई-वडील नसून एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यावर फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे. पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय वरोरा, तहसीलदार वरोरा यांना या संदर्भाची निवेदन दिली असल्याची माहिती दीली.

पत्रपरिषदेत दीपक मते, ऋषिकेश खंगार आदी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular