Saturday, January 17, 2026
HomeBussinessराष्ट्र निर्माणासाठी कर्मचाऱ्यांचे हित जोपासने महत्तवाचे - खा. प्रतिभा धानोरकर

राष्ट्र निर्माणासाठी कर्मचाऱ्यांचे हित जोपासने महत्तवाचे – खा. प्रतिभा धानोरकर

Cultivating the interests of employees is important for nation building – MP Pratibha Dhanorkar

चंद्रपूर :- राष्ट्र निर्माणासाठी कर्मचारी हा घटक देखील महत्तवाचा असल्याने त्याला मिळणाऱ्या सोयी सुविधा या देखील महत्तवाचे असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी संसदीय कोल व स्टील स्थायी समितीच्या दौऱ्या दरम्यान व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वतःहा फिल्ड वर जाऊन कर्मचाऱ्यांच्या समस्यासंदर्भात आढावा घेतला. Parliamentary Standing Committee on Mines and Steel

संसदीय खान व स्टील स्थायी समितीच्या चार दिवसीय दौऱ्याचे आयोजन 21 ते 24 जानेवरी 2025 दरम्यान रायपूर व गोवा येथे आयोजित करण्यात आले. समितीच्या सदस्या म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या दौऱ्या दरम्यान दि. 21 जानेवारी रोजी गेवरा ओपन कास्ट प्रोजेक्ट येथे भेट देऊन संबंधीत कर्मचाऱ्यांना फिल्ड वर येणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आढावा देखील घेतला.

दि. 22 जानेवारी रोजी भिलाई स्टिल प्लांट येथे भेट देऊन पर्यावरण व खान सुरक्षा संदर्भात स्टील ऑथॉरीटी ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धानोरकर यांनी चर्चे दरम्यान राष्ट्र निर्माणाकरीता उद्योगाची भुमीका महत्त्वाची असून त्याकरीता कर्मचाऱ्यांचे हित व सुरक्षा जोपासने महत्त्वाचे असल्याचे मत चर्चे दरम्यान व्यक्त केले. यावेळी सर्व खान व स्टील उद्योगांनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, तसेच उद्योग उभारतांना शेतकऱ्यांना संबंधीत जागेचा योग्य मोबदला व नौकरी तात्काळ देण्यासंदर्भाने खासदार धानोरकर यांनी संबंबधीत कर्मचाऱ्यांना सुचना देखील केल्या.

यावेळी कोल इंडिया लिमी. च्या बैठकीमध्ये कोळसा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, कोल इंडिया लिमी. चे अध्यक्ष, एस.ई.सी.एल. चे वरिष्ठ अधिकारी तसेच स्टील मंत्रालय, स्टील ऑथॉरीटी ऑफ इंडिया व भिलाई स्टील प्लांट च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खान व स्टील कमेटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular