Country-made rifle and 2 live cartridges found in Chandrapur
चंद्रपूर :- शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आरवट रोड वरील राजनगर, सहारा पार्क परिसरातून चंद्रपूर शहर पोलिसांनी सापळा रचून एक देशी कट्टा व 2 जिवंत काडतूस सह एका युवकाला अटक केली, आरोपी विरूद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Country-made rifle and 2 live cartridges seized
आरवट रोड सहारा पार्क, रामनगर परिसरात एक युवक देशी कट्टा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना प्राप्त झाली यावरून पोलीस निरीक्षक गुन्हे शोध पथकासह दाखल होत सापळा रचून युवकाला ताब्यात घेत Chandrapur city police set a trap त्याचे जवळील एक देशी कट्टा व 2 जिवंत काडतूस जप्त करीत आरोपी रोहित उर्फ मोनू कातकर (24 वर्ष) रा. विचोडा रयतवारी, पोस्ट पडोली, ता+जि चंद्रपूर विरूद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कायद्या अन्वये गुन्हा नोंद करीत अटक करण्यात आली. Chandrapur Crime
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधीकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक प्रभावती ऐकुरके पोलीस ठाणे चंद्रपुर शहर यांनी व त्यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील पोउपनि संदिप बच्छिरे, पोहवा सचिन बोरकर, भावना रामटेके, संजय धोटे, संतोष कनकम, कपूरचंद खरवार, विक्रम मेश्राम, रूपेश पराते, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, सारीका गौरकर व दिपीका झिंगरे यांनी केली असुन पुढील तपास सपोनि राजेंद्र सोनवने करीत आहेत.
