Monday, August 10, 2026
HomeMaharashtra"बाळूभाऊंचे सर्वसामान्यांच्या सेवेचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली"

“बाळूभाऊंचे सर्वसामान्यांच्या सेवेचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली”

चंद्रपूर :- दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर येथे आयोजित विशेष नोंदणी शिबिरादरम्यान पात्र नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ‘आयुष्मान कार्ड’ व ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’चे वाटप खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या शुभहस्ते करण्यात आले. Distribution of Ayushman and Ayushman Vaya Vandana cards

या योजनेमुळे गरजू नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. “आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या थेट दारापर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. दिवंगत बाळूभाऊंचे सेवेचे स्वप्न पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले व कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करावे,” असे भावनिक आवाहन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमास काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस गटनेते नगरसेवक सुरेंद्र अडबाले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर, झोन सभापती रामनरेश यादव, महिला व बालकल्याण उपसभापती सईदा बेगम ताजु शेख, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक सुनील खंडेलवार, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेविका महानंदा वाळके, नगरसेविका वैशाली महाडूळे, नगरसेविका शीला सिडाम, नगरसेविका करुणा चालखुरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular