Congress leader Mahesh Mendhe visited the hunger strike of electricity contract workers
चंद्रपूर :- चंद्रपूर येथे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने वीज खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यँत साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला तोडगा न निघाल्यास 20 ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांच्या घरासमोर लाक्षणिक आंदोलन करणार तर 24 ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदान ते उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत मोर्चा काढून तेथे वीज कंत्राटी कामगार आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आमरण उपोषण करणार आहेत.
तिन्ही वीज कंपन्यांतिल कंत्राटी कामगारांचे शोषण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी नॉमिनल मस्टर रोल किंवा हरियाणा सरकार प्रमाणे कंत्राटदारविरहित वयाच्या 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा, वेतनात वाढ, प्रलंबित मागण्यासाठी बाबुपेठ महावितरण सर्कल कार्यालया समोर सुरु असलेल्या उपोषण स्थळाला काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी भेट देऊन कंत्राटी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. आपण सुद्धा आपल्या लढ्यात सहभागी असल्याचे त्यांनी कामगारांना आश्वस्त केले.



