Tuesday, March 25, 2025
HomeIndustrialसेवानिवृत्त कोयला खदान मजदूर संघांचे भव्य कामगार संमेलनाचे आयोजन

सेवानिवृत्त कोयला खदान मजदूर संघांचे भव्य कामगार संमेलनाचे आयोजन

Retired Coal Mine Workers Sangh organizes grand labor meeting

चंद्रपूर :- कोळसा उद्योगात काम करणारे कामगार राष्ट्राच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर सेवानिवृत्त होतात. निवृत्ती दरम्यान एखाद्याला सामाजिक सुरक्षा आणि जीवनयापन खर्चासाठी एकरकमी रक्कम मिळते. दरम्यान, उर्वरित आयुष्यासाठी दरमहा पेन्शनची रक्कम देण्याची तरतूद आहे. आरामदायी जीवन सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय उपचारांचीही व्यवस्था आहे. परंतु या सुविधांपासून सेवानिवृत्त कोळसा कामगारांना या सुविधांपासून वंचित ठेवल्या जात आहे. सेवानिवृत्त कोळसा कामगारांच्या उचित मागण्यासाठी 17 आगस्ट ला सकाळी 11 वाजता ऑफिसर क्लब चांदा रैयतवारी कॉलरी, दूधडेअरी जवळ भव्य कामगार संम्मेलन चे आयोजन करण्यात आल्याची माहीती सेवानिवृत्त कोयला खदान मजदूर संघ चे उपाध्यक्ष शंभू विश्वकर्ता यांनी पत्रपरिषदेत दिली. Retired Coal Mine Workers grand labor meeting

सर्व सुविधांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी, दुसऱ्या फेरीच्या वाटाघाटीद्वारे सीपीआरएमएस (एनई) आणि पेन्शन योजना 1998 चे राजपत्र लागू करण्यासाठी ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली आहे. सीएमपीएफच्या पाच युनियन, व्यवस्थापन आणि कार्यरत अधिकारी निश्चित झाले आहेत, तरीही सेवानिवृत्त कामगारांना न्याय मिळत नाही. यासाठी अखिल भारतीय स्तरावर संघाची स्थापना करावी लागली.

निवृत्त कामगारांच्या समस्यांसाठी सीएमपीएफ आयुक्त धनबाद, कोल इंडिया लिमीटेड जुलै महिन्यात कोलकाता संचालक यांच्याशी चर्चा झाली. दरम्यान, कोळसा मंत्री कृष्णरेड्डी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सेवानिवृत्त कोळसा खाण कामगार युनियन चे केंद्रीय अधिकारी महेंद्र प्रताप सिंग, महासचिव बी. के. राय, उपाध्यक्ष शंभू विश्वकर्मा उपाध्यक्ष, मंत्री रमेश बल्लेवार, बिंदेश्वर प्रसाद आणि इतर कार्यकर्ता च्या माध्यमातुन निवेदन देण्यात आल्याची माहिती विश्वकर्मा यांनी दिली. यादरम्यान 1 जानेवारी 2017 पासून 20 लाख रुपयांच्या मर्यादेत ग्रॅच्युइटी अदा करावी, एसडीए 2016 पूर्वीच्या बेसीक, व्हीडीए व एसडीए जोडून पेशन देण्यात यावे, सीपीआरएमएस (एनई) अंतर्गत 8 लाखांच्या खर्चानंतर मजुरांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात, पीपीओचे पुनरुज्जीवन करताना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जाव्यात, पेन्शनमध्ये व्यत्यय आल्याने पेन्शन न मिळाल्यास ते व्याजासह दिले जावे, जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, ट्रान्झिट घरांची मांडणी क्षेत्रनिहाय करावी, ठेका कामगारांना सीएमपीएफ चे सदस्य बनवावे, स्मार्ट कार्ड द्यावे, जेष्ठ नागरीक, जेष्ठ महिलांना रेलवे तिकिटात पूर्वीप्रमाणे सुविधा देण्यात यावे आदि मागण्या केल्या गेल्या. यासंदर्भात सेवानिवृत्त कोयला खदान मजदूर संघ ने चंद्रपूर – वणी – आर्णी चे खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांना निवेदन देण्यात आले आहे.

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेवानिवृत्त कोयला खदान मजदूर संघ तर्फे शनिवार 17 आगस्ट 2024 ला सकाळी 11 वाजता आफिसर क्लब चांदा रैयतवारी कालरी, दुधडेअरी जवळ भव्य कामगार संम्मेलन चे आयेाजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात उद्घाटक राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, चंद्रपुर क्षेत्र चे क्षेत्रीय महाप्रबंधक हर्षल दातार, अधिवक्ता एड. किशोर पुसलावार, उपाध्यक्ष शंभू विश्वकर्मा, मंत्री रमेश बल्लेवार यांची प्रमुख उपस्थिति राहणार असल्याची माहिती शंभू विश्वकर्मा यांनी दिली.

पत्रपरीषदेला शंभू विश्वकर्ता, रमेश बल्लेवार, दिलीप सेंगारप, प्रकाश शेंडे, राजेंद्र राजकोंडावार, उध्दव गायकवाड, प्रदिप निखाडे, देवराव निब्राड, अरूण बेजाकिंवार उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular