PM Shree Savitribai Phule School ranked second at the Taluka level in the ‘Chief Minister My School Clean School’ competition
चंद्रपूर :- पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय मनपा चंद्रपूर ने यावर्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ शाळा’ स्पर्धेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करून आपला गौरव वाढवला आहे.
या यशामागे चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त श्री चंदन पाटील, यांच्या नेतृत्वात आणि उपायुक्त श्री भेलावे आणि उपायुक्त खवले यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली शाळेने स्वच्छता आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे यश प्राप्त झाले आहे. शाळेला रुपये दोन लाख रुपयाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. Chief Minister My School Clean School’ competition
शाळेतील सर्व शिक्षकांचे अथक परिश्रम आणि शाळेचे मुख्याध्यापक नित सर यांच्या कुशल नेतृत्वाने शाळेला या स्पर्धेत असे स्थान मिळवता आले आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ शाळा’ स्पर्धेत शाळेचा गौरव दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होत आहे.
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नाने हे यश साध्य झाले असून, शाळेने यापुढेही असेच उत्तुंग यश प्राप्त करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे शाळेच्या व्यवस्थापनाने म्हटलेआहे.