Chaos at Chandrapur District Stadium – Student falls victim to argument between two coaches
चंद्रपूर :- शहरातील जिल्हा स्टेडियमच्या जलतरण तलावावर रविवारी घडलेल्या प्रकाराने जलतरणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रशिक्षक श्रीकांत बल्की यांच्या हलगर्जीपणा आणि उर्मट वागणुकीमुळे १३ वर्षीय शालेय पोहणाऱ्याचे स्पर्धेत नुकसान झाले. एवढ्यावरच न थांबता, दुसऱ्या प्रशिक्षकाशी झालेल्या वादात बल्की यांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. Chaos at Chandrapur District Stadium
या प्रकाराने संतप्त पालकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार संताप व्यक्त केला. पालक अनिल झाडे यांनी स्पष्ट इशारा दिला की “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या प्रशिक्षकाला वाचवले जाणार नाही. तात्काळ कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन उभारू!”
राकेशकुमार रॉय या प्रशिक्षकासमवेत झालेल्या वादातून उघड झालेला हा प्रकार जिल्हा क्रीडा प्रशासनाच्या ढिलाईवर बोट ठेवतो आहे. स्पर्धेत नोंद झालेल्या विद्यार्थ्याला “नोंदणी नाही” असे कारण देत रोखणे, त्यानंतर प्रश्न विचारल्यावर पालक व शिक्षकांना धमकावणे ही प्रशिक्षक बल्कीची बेफिकिरी आणि दादागिरी पालकांना आता असह्य झाल्याची भावना पत्रपरिषदेत व्यक्त केली.
आयोजित पत्रकार परिषदेत राकेशकुमार रॉय, अनिल झाडे, मंजुषा झाडे, सुनीता टोंगे व पल्लवी वानखेडे उपस्थित होते.