Chandrapur’s development is gaining momentum, not stalling
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या कार्यपद्धतीवर आणि चंद्रपूरच्या विकासकामांवर जे बालिश आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप करण्यात आले आहेत, ते पूर्णपणे तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे आहेत. “चंद्रपूरच्या विकासाला ब्रेक” किंवा “फ्लॉप शो” सारख्या हेडलाईन्स वापरून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना अधिकृत सरकारी आकडेवारीनेच चोख उत्तर दिले आहे. वास्तविक पाहता, खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत (MPLADS) झालेली कामगिरी ही अत्यंत कौतुकास्पद असून मतदारसंघातील कामांचा धडाका वेगात सुरू आहे.
अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार, सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांत एकूण १०००.०० लाख (१० कोटी) रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी तब्बल ६७२.१३ लाख (६.७२ कोटी) रुपयांच्या कामांना त्वरित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. खासदार महोदयांच्या पाठपुराव्यामुळे या दोन वर्षांत एकूण ५१ कामांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ४१ कामे प्रत्यक्ष जमिनीवर सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे, यातील १२ कामे पूर्ण झाली असून, २९ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. तसेच सन २०२४-२५ या वर्षात वितरित झालेला १३५.६९ लाख रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे.
जे विरोधक केवळ राजकीय द्वेषापोटी ‘फ्लॉप शो’ म्हणून ओरडत आहेत, त्यांनी सरकारी कागदपत्रे चाळण्याची तसदी घ्यावी. केवळ वर्ष २०२५-२६ चा निधी १८ कामांना मंजुरी मिळवून त्यातील ८ कामे प्रगतीपथावर आहे. वास्तविक पाहता, केंद्र सरकारचे MPLADS ऑनलाईन पोर्टल अनेकदा तांत्रिक कारणांमुळे बंद असते, ज्यामुळे नवीन कामे प्रस्तावित करताना आणि प्रशासकीय मंजुरी मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा तांत्रिक अडचणींवर मात करत एकूण मंजूर ५१ कामांपैकी ४१ कामे प्रत्यक्ष सुरू करून घेणे हे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यक्षमतेचे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे अशा खोट्या, जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूने पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांवर जनतेने अजिबात विश्वास ठेवू नये. खासदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहेत आणि राहतील.