Chandrapur Shramik Journalists Sangh Award Announced Award Ceremony on Sunday 11th August
चंद्रपूर :- चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणार्या जेष्ठ पत्रकारांना प्रतिष्ठित अश्या कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. यावर्षी कर्मवीर पुरस्काराचे मानकरी वरिष्ठ पत्रकार संजय लोखंडे (नागपूर) व अशोक पोतदार, (भद्रावती) ठरले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा 11 ऑगस्टला मा.सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. Chandrapur Shramik Journalists Sangh Award Announced
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने, मत्स व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून हितवाद नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक कार्तीक लोखंडे तर, प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यात स्व.चांगुणाताई डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृती प्रित्यर्थ ना.मुनगंटीवार यांचे तर्फे ग्रामीण वार्ता पुरस्कार देण्यात येणार आहे. ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार अनिल पाटील (वरोरा पुण्यनगरी), द्वितीय प्रशांत खुळे, (वरोरा तरुण भारत), तृतीय अमर बुद्धारपवार (नवरगाव, पुण्यनगरी), प्रोत्साहनपर पुरस्कार आमोद गौरकार, (शंकरपूर लोकमत), प्रशांत डांगे,(ब्रह्मपुरी महासागर) यांना दिला जाणार आहे.
तसेच चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी स्व.छगनलाल खजांची स्मृती प्रित्यर्थ,अॅड. प्रशांत खजांची तर्फे शुभवार्ता पुरस्कार साईनाथ कुचनकर (लोकमत चंद्रपूर), स्व सुरजमलजी राधाकीसन चांडक स्मृती प्रित्यर्थ, गिरीश चांडक यांचे कडून मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार
निलेश व्याहाडकर (दै. भास्कर, चंद्रपूर) स्व.रामकुंवर सिंह यांच्या स्मृती प्रित्यर्थ, के के.सिंह यांचे कडून शोध पत्रकारिता डिजिटल (पोर्टल) विभाग विजय सिद्धावार (पब्लिक पंचनामा मूल), स्व श्रीमती सुशीला राजेंद्र दीक्षित यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉ किर्तीवर्धन दीक्षित यांचे तर्फे उत्कृष्ट वृत्तांकन (टीव्ही) हैदर शेख (टीव्ही 18 लोकमत), इतिहास तज्ञ अशोक सिंह ठाकूर यांचे तर्फे वृत्त छायाचित्र पुरस्कार संजय बांगडे (लोकमत, सिंदेवाही) यांना घोषीत करण्यात आला आहे.
तसेच पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या वाटचालीत योगदान देणार्या माजी पत्रकारांना गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. यात पंकज शर्मा, स्व. गजानन ताजणे, अरविंद खोब्रागडे, प्रशांत देवतळे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.