Saturday, May 23, 2026
HomeCrimeगो-तस्करांवर चंद्रपूर पोलिसांचा दणका

गो-तस्करांवर चंद्रपूर पोलिसांचा दणका

Chandrapur Police Crack Down on Cattle Smugglers

चंद्रपूर :- जिल्ह्यात वाढत्या अवैध गो-वंश तस्करी, कत्तल व मुक्या जनावरांवरील क्रूरतेला आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मोठी आणि कठोर मोहीम हाती घेतली आहे. पोलीस मुख्यालयातील ‘ड्रिल शेड’ येथे आयोजित विशेष “ओळख परेड व प्रतिबंधात्मक कारवाई कॅम्प”मध्ये जिल्ह्यातील तब्बल २९३ सराईत गो-तस्करांची नोंद घेऊन त्यांना कडक कायदेशीर इशारा देण्यात आला. Chandrapur Police Crack Down on Cattle Smugglers

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कायंदे पाटील (IPS), सचिन खेत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पथकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा आणि गडचांदूर या सर्व उपविभागांतील सराईत गो-तस्करांची संपूर्ण माहिती पोलिसांनी संकलित केली असून, भविष्यातील हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मकोका’सह कठोर कारवाईचा इशारा
पोलीस प्रशासनाने यापुढे अवैध जनावरांची वाहतूक व गो-तस्करी करणाऱ्यांवर केवळ सामान्य गुन्हे दाखल न करता संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अशा गुन्ह्यांमध्ये जामीन मिळणे कठीण होणार असून आरोपींना दीर्घकाळ तुरुंगवासाला सामोरे जावे लागू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले.

अवैध संपत्ती व वाहनांवरही कारवाई
गो-तस्करीतून मिळवलेल्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असून तस्करीसाठी वापरलेली वाहने थेट सरकार जमा (राजसात) करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी नागरिकांना अवैध गो-तस्करीची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे गो-तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यात कायद्याचा धाक अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular