Friday, February 7, 2025
HomeAcb Trapन्यायिक हक्कासाठी एकत्रित लढा देण्याची गरज

न्यायिक हक्कासाठी एकत्रित लढा देण्याची गरज

Need to fight together for judicial rights Assertion of MLA Sudhakar Adbale

चंद्रपूर :- १ नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करावी, यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील लाडक्या बहिनींसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करून त्यांना लाभ दिला. पण, उद्याचे भविष्य घडविणारे आमचे राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी हे टप्पा वाढ अनुदान मंजूर करण्यासाठी फक्त ९२६ कोटींची तरतूद मागते आहे. शासनाने शिक्षण क्षेत्रात खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था उध्वस्त होत आहे. मराठी शाळांची दुरवस्था झालेली आहे. शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी न्यायिक हक्कांसाठी एकत्रित येऊन लढा देणे, आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) अधिवेशन १२ जानेवारी २०२५ रोजी माउंट सायन्स जुनिअर कॉलेज, बल्‍लारपूर येथे पार पडले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून आमदार अडबाले बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे होते. तर उद्घाटक म्हणून आमदार ॲड. अभिजित वंजारी होते. स्वागताध्यक्ष म्हणून चंद्रपूर मल्टीपर्पज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाऊराव झाडे, प्रमुख अतिथी म्हणून विमाशि संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, जगदिश जुनगरी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अरविंद राऊत, गडचिरोली जिल्‍हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्‍हा कार्यवाह अजय लोंढे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, मारोतराव अतकारे, यवतमाळ जिल्‍हाध्यक्ष पवन बन, विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रविण चटप, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकर, कार्यवाह सुरेंद्र अडबाले, निवडणूक अधिकारी अनिल वागदरकर, ज्ञानेश्वर काटोले, रामेश्वर डोर्लीकर, श्रीधर फटाले, सुभाष ताजने, प्राचार्य शैलेश झाडे, राजेंद्र खाडे, आदींची यांची उपस्थिती होती. Chandrapur District Convention of Vidarbha Secondary Teachers Association

याप्रसंगी बल्लारपूर तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक कर्मचारी तथा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा अधिवेशनामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना १० वर्ष, २० वर्ष, ३० वर्षाच्या अहर्ताकारी सेवेनंतर वेतनश्रेणीचा वरचा टप्पा मिळवण्यासाठी तात्काळ शासन निर्णय निर्गमित करणे. इयत्ता ६ वी ते ८ वी या वर्गांना शिकविणाऱ्या सर्व पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांना हायस्कूल शिक्षकांची वेतनश्रेणी मंजूर करणे, इत्यादी विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आमदार अभिजीत वंजारी यांनी शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरणावर कडाडून टीका केली. अध्यक्षीय मनोगतातून माजी आमदार डायगव्हाणे यांनी भविष्यातील शाळांना मिळणारे अनुदान गोठवण्यात येण्याची शक्यता वर्तविली. त्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एकजूट होऊन लढा द्यावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी विमाशि संघाची नवीन चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणी निवडण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाहपदी दीपक धोपटे तर उपाध्यक्षपदी आनंद चलाख, हेमंतकुमार किंदर्ले, अजय विधाते, प्रज्ञा बारेकर, कोषाध्यक्षपदी नितीन जीवतोडे, सहकार्यवाहपदी रुपेश पुरी, हरिहर खरवडे, आसमा खान, नंदकिशोर वर्धेलवार यांची बिनविरोध निवड झाली. माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे, आमदार सुधाकर अडबाले व अभिजीत वंजारी यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले. संचालन प्रकाश उरकुंडे, कुमारी कांबळे मॅडम, पावडे सर यांनी केले. आभार दीपक धोपटे यांनी मानले. अधिवेशनाला मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular