Friday, January 17, 2025
HomeCrimeप्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्याला शहर पोलीसांनी केली अटक

प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्याला शहर पोलीसांनी केली अटक

Chandrapur city police arrested a person who was carrying deadly weapon dagger

चंद्रपूर :- तान्हा पोळा सणाच्या दिवशी चंद्रपूर शहर पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अवैध प्राणघातक शस्त्र खंजर (चाकू) बाळगणाऱ्याला अटक केली. deadly weapon dagger

चंद्रपूर शहर पोलिसांचे पथक पोळा, तान्हा पोळा सणाचे बंदोबस्त दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना एक युवक परराज्यातून अग्निशस्त्र आणल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. Chandrapur Crime News

यावरून शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने कामगार चौक, चंद्रपूर येथे सापळा रचून युवकाला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्या बॅग मध्ये एक मोठा खंजर (चाकू) आढळून आला, यावरून आरोपी लोकेश उर्फ शालू चव्हाण (18 वर्ष) याला अटक करीत भारतीय शस्त्र अधिनियम 4, 25, सहकलम 37 (1) (3) (अ), 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी विचारणा केली असता, सदर अग्निशस्त्र आरोपीने उत्तरप्रदेश राज्यातून आणल्याचे सांगितले.

आरोपीवर मध्यप्रदेश राज्यातील बैतुल व चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्यात बालक असतांना एटीएम संदर्भाने गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सदर कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे सुचनेप्रमाणे मंगेश भोगांडे स.पो.नि, संतोष निंभोरकर पोउपनि, पोहवा महेद्रं बेसरकर, सचिन बोरकर, निलेश मुडे, मपोहवा/भावाना रामटेके, संतोष पंडीत, इम्रान खान, कपुरचंद खरवार, सचिन राठोड, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, शाहबाज सैयद, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, इरशाद शेख, मंगेश मालेकर, राहुल चितोड, विक्रम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular