Central government’s decision on caste-wise census welcomed and celebrated in Chandrapur
चंद्रपुर : केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत केंद्राने कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. घोषणा होताच काही वेळातच चंद्रपूर शहरात विद्यार्थी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.३० एप्रिल) ला एकच जल्लोष केला व केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत अभिनंदन केले. Central government’s decision on caste-wise census
प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा प्रश्न मार्गी
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. आज (दि.३० एप्रिल) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. स्वतंत्र भारतात १९५१ साली पहिली जनगणना करण्यात आली होती. तर २०११ साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनाच्या माध्यमातून जातिनिहाय जनगणना करण्यात यावी ही आग्रही मागणी होती. अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विदर्भवादी ओबीसी नेते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोषात केंद्र सरकारचे स्वागत केले. OBC students and office bearers of the National OBC Federation celebrated with joy




