CBSE should reconsider 10th board exam
चंद्रपूर :- केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने 2026 पासून 10वी च्या परीक्षांमध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी मसुदा तयार करुन नविन नियमांना मंजुरी दिली आहे. नविन नियमाअंतर्गत 10वी बोर्डाची परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नविन मसुदा नियमांना विरोध दर्शवित त्या आशयाचे पत्र केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या अध्यक्षांना पाठविले आहे. CBSE should reconsider 10th board exam
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या नविन नियमानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा द्यावी लागणार असल्याने व माध्यमिक शिक्षा मंडळाने बदलविलेल्या मसुदा नियमांच्या अनुषंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे अनेक विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार खासदार धानोरकर यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहित आक्षेप नोंदविलेला आहे. MP Dhanorkar’s letter to Chairman Central Board of Secondary Education



