BSNL cable theft exposed ; four accused arrested
चंद्रपूर :- भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) BSNL विभागाच्या केबल तार चोरीप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गुन्हा उघडकीस आणत तब्बल १७,२७,६१६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. BSNL cable theft exposed
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अभिजीत जिवने (बीएसएनएल अधिकारी, चंद्रपूर) यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे तक्रार दाखल केली होती. दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी ओल्ड जीएमटी कार्यालय परिसरातील काउंटरजवळ साठवून ठेवलेला केबल साठा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या मालामध्ये १२०० जोडीचा केबल (लांबी २८० मीटर) किंमत अंदाजे ८,३१,३३२ रुपये, ८०० जोडीचा केबल (लांबी १८६ मीटर) किंमत अंदाजे ५,४६,२८२ रुपये, असा एकूण १३,७७,६१४ रुपयांचा केबल माल समाविष्ट होता.
या तक्रारीवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे गुन्हा क्र. १६१/२०२६, कलम ३०५ (म), ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू करत गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला, तपासा दरम्यान पोलिसांनी पयनप्पा रवी शेट्टी (वय ३५, रा. सावरकर नगर, चंद्रपूर)
नितीन बाबुराव उरकुडे (वय ३३, रा. आरटीओ ऑफिस मागे, चंद्रपूर), ललित रोशन देशभ्रतार (वय २३, रा. उडिया मोहल्ला, चंद्रपूर)
विजयकुमार कार्तिकराम नैताम (वय २०, रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर) यांना ताब्यात घेतले. Chandrapur City P
आरोपींना पोलिसी खाक्या दाखवला असता आरोपींनी केबल चोरी करून त्या जाळून त्यामधील तांबे वेगळे काढून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी जाळलेल्या केबलमधून मिळालेला तांबा (किंमत १३,७७,६१४ रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलँड कंपनीचे मालवाहू चारचाकी वाहन (किंमत ३,५०,००० रुपये) असा एकूण १७,२७,६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, विलास निकोडे, मपोहवा भावना रामटेके, पोलीस अंमलदार सचिन बोरकर, संजय धोटे, इमरान शेख, निकेश ढगे, जावेद सिद्दीकी, कपुरचंद खेरवार, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सुशांत धिवे, दिपिका झिंगरे यांनी केली.