Friday, May 22, 2026
HomeUncategorizedबनावट ओळखपत्रापासून सावध रहा

बनावट ओळखपत्रापासून सावध रहा

Registered construction workers’ identity cards are free of charge

चंद्रपूर :- महाराष्ट्र‌ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रामार्फत नि:शुल्क वितरीत करण्यात येते. पंरतु काही व्यक्ती दलालांमार्फत पैसे घेऊन बनावटी ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) दिले जात असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत. करीता कोणत्याही बांधकाम कामगारांनी सदरील व्यक्ती /दलाला मार्फत बनावटी ओळखपत्र न घेता जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रातून आपले ओळखपत्र (स्माट कार्ड) घ्यावे. An appeal to be wary of fake identity cards

सदर ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) हे निःशुल्क असल्याने कोणाही व्यक्तीस /एजेंट यांना पैसे देऊ नये. तसेच पैशांची मागणी करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आवाहान सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular