Saturday, January 18, 2025
HomeAssembly Electionब्रिजभूषण पाझारेंचा उठाव - रंगतदार वळणावर

ब्रिजभूषण पाझारेंचा उठाव – रंगतदार वळणावर

Brijbhushan Bazaar Uprising..        Chandrapur Assembly Elections on a different Turn

चंद्रपूर :- ऐन तारुण्यात भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून तब्बल 30 वर्ष पक्षाला देणारा, मात्र निवडणूक येताच पक्षाने तिकीट नाकारताच उठाव करीत अपक्ष उमेदवारी घोषित करणारे ब्रिजभूषण पाझारे Brijbhushan Pazare यांच्यामुळे चंद्रपूर विधानसभा निवडणूक Chandrapur Assembly Election रंगतदार वळणावर पोहचली आहे. पाझारे यांना मिळत असलेला जनाधार भाजप व काँग्रेस उमेदवारांना घाम फोडत आहे.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती करिता आरक्षित आहे. त्यामुळे भाजप ब्रिजभूषण पाझारे यांना मैदानात उतरवेल अशी मतदारांची आणि भाजप कार्यकर्त्यांची आशा होती. पाझारे गेली 30 वर्ष भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कार्य करीत आहेत. घुगूस परिसरातील भाजपचा चेहरा असलेले पाझारे लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद असा त्यांचा चढता आलेख असून सर्वसामान्य लोकांच्या कायम संपर्कात राहून ते पक्षाला वाढवित होते.

चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत गेली दोन टर्म डावलण्यात आल्यावरही नाराज न होता ते अहोरात्र कार्यरत होते. यावेळी पक्ष आपल्याला तिकीट देईल हा विश्वास त्यांना होता. पक्षात कुणी स्पर्धक नव्हते. मात्र ऐन वेळेवर भाजपने स्थानिक नेतृत्वाचा प्रखर विरोध पत्करून किशोर जोरगेवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपचा एक गट पूर्णतः नाराज झाला. पाझारे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. मात्र आता नाही तर कधीच नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी बंडखोरी केली. खरंतर ही बंडखोरी नव्हे तर अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची कृती असून हा उठाव ठरला आहे.

त्यांनी अपक्ष उमेदवारी घोषित करताच ते जास्त प्रभाव पाडणार नाहीत हा अंदाज बांधण्यात आला. मात्र त्यांची उमेदवारी ही त्यांची न राहता आता साऱ्यांनीच झाली आहे. गोरगरीब, मजूर, शेतकरी, कष्टकरी या साऱ्यांपासून नवमतदार असलेल्या तरुणांपर्यंत सारेच “मी ब्रिजभूषण” समजून कामाला लागले आहेत.

पाझारे आता जनतेचे उमेदवार झाले असून त्यांच्यासाठी सकारात्मक चित्र मतदारसंघात दिसते आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या उमेदवारीस सुरुवातीला केलेला विरोध त्यांच्यासाठी मवाळ झाला असला तरी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही जोरगेवार यांना उमेदवार मानण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. यंग चांदा ब्रिग्रेड आणि भाजप कार्यकर्ते यांच्यातील सुप्त वाद आता मतदारांपर्यंत पोहचला असून याचा पाझारे कसा फायदा करून घेतात यावर बरेच अवलंबून राहणार आहे. पक्षातील एक गट पाझारे यांच्यासाठी सक्रिय झाला असून ते आता खऱ्या अर्थाने वातावरण निर्मिती करीत आहेत.

काँग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर अजूनही आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र असल्यामुळे व काँग्रेस चे नेते प्रचारात उतरण्यास कंजूषी करीत असल्याने पडवेकर बॅक फुटवर गेले आहेत. यामुळे काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेले मुस्लिम आणि बौद्ध मतदार यावेळी ब्रिजभूषण पाझारे यांचे पाठिशी उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जोरगेवार यांनी घेतली धास्ती
पाझारे यांना वाढता प्रतिसाद बघता भाजप उमेदवार जोरगेवार यांनी धसका घेतला आहे. दररोज होत असलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची संख्या रोडावत आहे. वॉर्डावॉर्डात जेवणावळी सुरू केल्या आहेत. तरीही अत्यल्प उपस्थिती असल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरणात परसले आहे. याचा फायदा पाझारे यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असे समीकरण मतदारसंघात होताना दिसत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular