Wednesday, April 15, 2026
HomeMaharashtraसंविधान देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ

संविधान देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ

The Constitution bestowed by Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar is the cornerstone of the nation’s democracy

चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताचे दिशादर्शक होते. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कठोर परिश्रमांच्या बळावर समाजातील अन्याय, विषमता आणि अज्ञानाविरुद्ध लढा दिला. त्यांनी दिलेले संविधान आपल्या देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

चंद्रपूर महामार्ग पोलीसचे उत्कृष्ठ कार्यबद्दल प्रथम पुरस्काराने सन्मानित……..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. तसेच गांधी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आमदार किशोर जोरगेवार यांनी अभिवादन केले. MLA Kishor Jorgewar pays tribute to Dr. Babasaheb Ambedkar

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, महामंत्री रविंद्र गुरुनुले, मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, गटनेते शेखर शेट्टी, बलराम डोडाणी, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, बहुजन महिला आघाडी अध्यक्षा विमल कातकर, अरुण तिखे, तुषार सोम, निलेश बेलखेडे, नगरसेविका सविता कांबळे, अॅड. सारिका संदुरकर, आशा देशमुख, शीतल गुरुनुले, पुष्पा उराडे, सरला कुळसंगे, नगरसेवक भालचंद्र दाणव, जितेश कुळमेथे, रॉबिन बिश्वास, नितेश गवळी, आशिष मासिरकर, स्वप्निल डुकरे, सायली येरणे, राकेश नाकाडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार, वंदना तिखे, चंद्रशेखर देशमुख, प्रमोद शास्त्रकार, सुधीर कारंगल, अॅड. परमहंस यादव, राकेश बोमनवार, रीना साखरकर, लक्ष्मी पांडे, छाया चावरे, आमेश आयलू आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, नागपूरनंतर चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली. या पवित्र दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प आपण केला आहे. यासाठी ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणी दूर करून या विकासकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आपण शहरातील बुद्ध विहारांमध्ये निधी उपलब्ध करून दिला असून, या निधीतून १३ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका तयार होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

बाबासाहेबांनी नेहमीच शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व दिले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजात परिवर्तन घडवून आणता येते, ही त्यांची शिकवण आपण सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या काळात बाबासाहेबांच्या विचारांची अधिक गरज आहे. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे.

बाबासाहेबांचे जीवन हे संघर्ष आणि यश यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन जगाला आपल्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्यात मोठी उद्दिष्टे साध्य करावी.

बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular