Assembly level workers meeting of Bahujan Samaj Party concluded at Bramhapuri
चंद्रपूर :- बहुजन समाज पार्टी BSP विधानसभा ब्रम्हपुरी व्दारा दिनांक ८ सप्टेंबर रोजी ब्रम्हपुरी येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्याला बहुजन समाज पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शिरिजकुमार गोगुलवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक चंद्रपूर जिल्हा प्रभारी राजेंद्र रामटेके तर जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर साठे उपस्थित होते. Assembly level workers meeting of BSP

मेळाव्याचे सुत्र संचालन ब्रम्हपुरी विधानसभा प्रभारी नंदू खोब्रागडे यांनी केले. मेळाव्याचे प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष विजय जनबंधु तर आभार प्रदर्शन ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष राजु मेश्राम यांनी केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष राजुभाऊ मेश्राम, ब्रम्हपुरी तालुका प्रभारी प्रकाश किन्नाके, तालुका अध्यक्ष गौतमजी धोंगडे, युवक आघाडी शहर अध्यक्ष विकास सोनडवले, विधानसभा प्रभारी प्रभाकर उरकुडे, नंदू खोब्रागडे, हीरामण मेश्राम, खेमदेव नंदेश्वर, विधानसभा अध्यक्ष विजय जनबंधु, विधानसभा उपाध्यक्ष विकास गेडाम, महासचिव अंबादास निहाटे, विधानसभा सचिव संतोष उंदिरवाडे, सचिन बन्सोड, बिव्हीएफ संयोजक अनिल बारसागडे, सिंदेवाही शहर अध्यक्ष डॉ रेवानंद बांबोळे, उपाध्यक्ष तेजस डोंगरे, युवक आघाडी ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष प्रितम मेश्राम, या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले…