Friday, January 17, 2025
HomeHealthआरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना मंजुरी

आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना मंजुरी

State government approves seven sub-centers of health center

चंद्रपूर :- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्यसेवा अद्ययावत करण्यासाठी सदैव कटिबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांनी सदैव तत्परता दाखवली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या पाठपुराव्यानंतर आता मुल व पोंभुर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. approves seven sub-centers of health centerबल्लारपूर विधानसभेतील Ballarpur Assembly मुल व पोंभुर्णा तालुक्यातील सर्वसामान्य नागिरकांची अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्राची मागणी होती. त्याची दखल घेत ना. श्री. मुनगंटीवार यांनी तसा प्रस्ताव तातडीने संबंधित मंत्रालयाला पाठविला होता. या प्रस्तावाची दखल घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपकेंद्राच्या मंजुरीची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मुल तालुक्यातील चितेगांव, पिंपरी दीक्षित, फिस्कुटी, सुशी, तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम, फुटाणा व जामतुकूम या गावांमध्ये उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘विशेष बाब’ म्हणून या केंद्रांना मंजुरी दिल्याचे पत्रात नमूद आहे.

ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उपकेंद्रांची मागणी मंजूर झाल्यामुळे खेड्यापाड्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला तत्परतेने आरोग्यसेवा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. आयुष्यात रुग्णसेवेचे कार्य सर्वोपरी आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार सातत्याने म्हणत असतात. त्याची पुन्हा एकदा प्रचिती यानिमित्ताने आली आहे.

जिल्ह्यात कर्करोग रुग्णालय
ना. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हात १४० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारले जात आहे. याचा उपयोग संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे. एक धर्मशाळा देखील उभारण्यात येणार आहे. खनिज निधितून कॅन्सर व्हॅनसाठी निधी मंजुर केला आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आलेले आहे. या व्हॅनचा फायदा गावागावातील नागरिकांना होणार आहे.

मुल येथे १०७ कोटी रुपयांचे आधुनिक रुग्णालय
मुल येथे १०७ कोटी रुपयांचे १०० खाटांचे आधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजनही नुकतेच पार पडले. केवळ मुल नव्हे तर परिसरातील प्रत्येकाला हे आरोग्य मंदिर वाटेल, अशी त्यामागची संकल्पना ना.मुनगंटीवार यांची आहे. यापूर्वी आरोग्यक्षेत्रातील अनेक कामे ना.मुनगंटीवार यांनी केली आहे. बल्लारपूर येथे ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र,पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती,पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अशी असंख्य कामे झाली आहे.

दिव्यांग, नेत्र रुग्णांची सेवा
ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत नेत्र चिकित्सा शिबिरातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू ऑपरेशन केले. ३५ हजारांहून अधिक जास्त चष्मे दिले आहेत.

मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया
लहान मुलांच्या हृदय शास्त्रक्रियेकरिता खाजगी रुग्णालयात १० लाख रुपये लागत असताना या शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलच्या चमूद्वारे मोफत करून देण्यात आल्या. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातूनच हे शक्य झाले. २ ते १० वर्षांपर्यंतच्या ६० लहान मुलांचे ऑपरेशन करण्यात आले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular