Sunday, March 23, 2025
HomeMaharashtraपत्रकारितेत काळानुरूप बदल आवश्यक - ना. सुधीर मुनगंटीवार

पत्रकारितेत काळानुरूप बदल आवश्यक – ना. सुधीर मुनगंटीवार

Change in journalism is necessary with time – Minister Sudhir Mungantiwar
Chandrapur Shramik Journalist Sangh Award Distribution Ceremony

चंद्रपुर :- समाजहितासाठी कार्य करणाऱ्या शोषितांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या किंवा स्वत:च्या लेखणीद्वारे त्यांना न्याय देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार केला गेला. आताच्या पत्रकारितेत काळानुरूप बदल करण्याची आवश्यक आहे. निष्ठेने काम करण्याऱ्या पत्रकारांची संख्या वाढावी यादृष्टीने प्रयन्त केला गेला पाहीजे. एखाद्या विषयाची बातमी करून थांबायच नसत तर तो विषय पूर्ण मार्गी लागेपर्यत किंवा समाजाला न्याय मिळेपर्यंत झटायच असत असे विचार वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिला मध्यवर्ती सहकारी बँक लि. येथील कन्नमवार सभागृहमध्ये रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयेाजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. Chandrapur Shramik Journalist Sangh Award Distribution Ceremony

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मंचावर वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्घाटक व मार्गदर्शक नागपूर द हितवाद चे जेष्ठ उपसंपादक कार्तिक लोखंडे, प्रमुख अतिथि चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, कर्मवीर पुरस्काराचे मानकरी संजय लोखंडे, अशोक पोतदार, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, सचिव प्रविण बतकी आदि उपस्थित होते.

यावेळी मान्यवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, कार्तिक लोखंडे यांचा शाल, श्रीफल, वृक्ष, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारीता क्षेत्रात ज्यांनी योगदान दिले होते असे गजानन ताजने व अन्य ज्ञात अज्ञात पत्रकारांना श्रध्दांजली देण्यात आली.

प्रास्ताविक भाषण संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. कर्मवीर पुरस्कार प्राप्त नागपूर चे जेष्ठ पत्रकार संजय लोखंडे व भद्रावती चे जेष्ठ पत्रकार अशेाक पोतदार यांचे मानपत्राचे वाचन मंगेश देशमुख यांनी केले. उक्त दोन्ही जेष्ठ पत्रकारांचा शाल, श्रीफल, स्मृतिचिन्ह, सम्मान राशी देऊन सत्कार करण्यात आला. जेष्ठ पत्रकार संजय लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

स्पर्धा परिक्षक जिला माहीती अधिकारी राजेश येसनकर व डा. पद्मरेखा धनकर यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार प्राप्त पुण्यनगरी वरोरा प्रतिनिधि अनिल पाटील, व्दितीय पुरस्कार तरूण भारत वरोरा प्रतिनिधि प्रशांत खुळे, तृतीय पुरस्कार नवरगांव पुण्यनगरी प्रतिनिधि अमर बुध्दारपवार यांचा शाल, श्रीफल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, सन्मान राशी तर प्रोत्साहन पुरस्कार शंकरपुर लोकमत प्रतिनिधि आमोद गौरकार, ब्रम्हपुरी महासागर प्रतिनिधि प्रशांत डांगे यांचा शाल, श्रीफल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, सन्मान राशी व गौरव पुरस्कार पंकज शर्मा व गजानन ताजने तर्फे संजय तुमराम यांचा सन्मानचिन्ह, शुभवार्ता पुरस्कार प्राप्त लोकमत चे प्रतिनिधि साईनाथ कुचनकर, मानवी स्वारस्य अभिरूची पुरस्कार दैनिक भास्कर प्रतिनिधि निलेश व्याहाडकर, शोध पत्रकारिता डिजीटल पोर्टल मूल चे पब्लिक पंचनामा प्रतिनिधि विजय सिध्दावार, उत्कृष्ट वृत्तांकन (टिव्ही) न्यूज 18 लोकमत चे जिला प्रतिनिधि हैदर शेख, वृत्त छायाचित्र पुरस्कार संदिप बांगडे यांचा शाल, श्रीफल, स्मृतिचिन्ह, सन्मान राशी, प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक व्यक्ति मध्ये काम करण्याची तळमळ असली पाहीजे. पत्रकारांच्या स्वास्थ सुविधासाठी आवश्यक असलेली जीवनदायी योजना मागणी अनुसार सुरू करण्यात आली. पत्रकारांनी काळानुरूप बदलण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. निष्ठेने काम करण्याऱ्या पत्रकारांची संख्या वाढने फार गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टीने संख्या वाढावी यादृष्टीने विचार करायला पाहिजे. केवळ बातमी करून थांबणार नाही तर समाजाला त्याचे समाधान करवुन देण्याचा प्रयत्न केला पाहीजे. यावेळी त्यांनी शहरातील ज्युबिली हायस्कूल जवळ वाचनालयासाठी 14 करोड रूपयांची घोषणा केली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना स्मृतिचिन्ह देऊन प्रायोजक सत्कार करण्यात आला. Change in journalism is necessary with time – Minister Sudhir Mungantiwar

आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उद्घाटक भाषणात जेष्ठ उपसंपादक कार्तिक लोखंडे यांनी पत्रकारीतेचा प्रवास आता फार लांब होत चालला आहे. पत्रकारीता करणारे प्रतिनिधीं चे वाचन कमी झाले आहे. वाचनाची आवड निर्माण झाली पाहीजे. पत्रकार भवनात असलेल्या वाचनालयाचा लाभ घ्यावा. यावेळी त्यांनी पत्रकारांसाठी फेलोशिप स्पर्धा आयोजीत करण्याची विनंती पालकमंत्री मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांचेकडे केली. पत्रकारांसाठी आनलाईन वर्कशाप Online Workshop घेण्याचा सल्ला दिला. जेनेकरूण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधीला उत्तम कार्य करता येईल.

यानंतर शहरातील इतिहासतज्ञ अशोक सिंह ठाकुर यांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.

सोहळ्याचे संचालन पंकज मोहरीर तर आभार प्रविण बतकी यांनी केले.

कार्यक्रमाला अन्य वृत्तपत्र, इलेक्ट्रानिक वाहिनी, पोर्टल, प्रतिष्ठित सामान्य नागरीक, सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular