Friday, April 17, 2026
HomeForestताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना संपन्न

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना संपन्न

Animal census on the occasion of Buddha Purnima at Tadoba Andhari Tiger Reserve

चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर व बफर क्षेत्रात दिनांक 12 मे 2025 रोजी बुद्ध पौर्णिमेला “निसर्गानुभव” कार्यक्रम आयोजित केला गेला होता. याकरीता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या https://mytadoba.mahaforest. gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. सदर कार्यक्रमामध्ये कोर क्षेत्रात 96 मचानावर व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी व बफर क्षेत्रात 81 मचानावर 162 निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. Animal census on the occasion of Buddha Purnima at Tadoba Andhari Tiger Project 

या व्याघ्र प्रकल्पातील कोर विभागात मोहर्ली, ताडोबा, कोळसा, कोलारा व कारवा असे एकूण 5 वनपरिक्षेत्र तसेच बफर विभागात पळसगाव , चंद्रपूर, मूल, शिवणी, खडसंगी व मोहर्ली असे एकूण 6 वनपरिक्षेत्र आहेत. त्यानुसार सदर कार्यक्रमामध्ये निसर्गप्रेमींनी प्राण्यांच्या संख्या आढळून आल्या यात जंगलाचा राजा वाघ कोर भागात 39 तर बफर विभागात 24 असे एकूण 63 वाघांची संख्या नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वात चपळ प्राणी बिबट कोर विभागात 9 तर बफर भागात 4 असे एकूण 13 बिबटे आढळले.

कोर भागात 50 अस्वल आणि बफर भागात 43 असे एकूण 93 अस्वल ताडोबा भागात आढळले. रानकुत्रे कोर भागात 86 आणि बफर भागात 10 असे एकूण 96 आढळले, मुंगूस कोर 62, बफर 38 असे एकूण 100 आढळले. Tadoba Andhari Tiger Project

 

ताडोबा जंगल परिसरात सर्वात जास्त चितळ या वन्यप्राण्यांची संख्या आढळली यात कोर क्षेत्रा मध्ये 1249 तर बफर भागात 488 असे एकूण 1737 आढळले आहेत त्यानंतर (बंदर) माकड यांची संख्या जाणून घेऊ या कोर भागात 534 आणि बफर क्षेत्रात 323 असे एकूण 857 माकड आढळून आली.

यादरम्यान रानगवा कोर 300, बफर 282 एकूण 582, मोर 450,101 एकूण 551, सांबर 385, 168 एकूण 553, रानडुक्कर 272, 109 एकूण 381, नीलगाय 24,63 एकूण 87 आढळून आले.
इतरही वन्य प्राण्यांची गणना यावेळी करण्यात आली यात रानकोंबडा, ससा, सायाळ, चिंकारा, तडस, उडती खार, उद मांजर, जवादि मांजर, मगर चांदी अस्वल, भेडकी, चौशिंगा असे एकूण 5502 वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे पर्यावरण जागृती, जैवविविधतेची जाणीव व वन्यजीव संवर्धनाबाबत जनसामान्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम वनविभागामार्फत सातत्याने राबविण्यात येतील असे आवाहन वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular