Monday, March 17, 2025
HomeAgricultureकृषीच्या विद्यार्थ्यांनी उद्योजकतेची कास धरावी - डॉ क्रिष्णा इल्ला

कृषीच्या विद्यार्थ्यांनी उद्योजकतेची कास धरावी – डॉ क्रिष्णा इल्ला

Agriculture students should embrace entrepreneurship – Dr Krishna Illa

चंद्रपूर :- महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचलित आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोरा च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ क्रिष्णा इल्ला यांनी कृषीचे विद्यार्थी हे कृषी आधारित उद्योजकतेमध्ये उत्तम प्रकारे काम करू शकतात तसेच येत्या काळामध्ये उद्योजकते शिवाय पर्याय नाही त्यामुळे कुठलाही न्यूनगंड न बाळगता विद्यार्थ्यांनी उद्योजकेकडे सकारात्मक रित्या वळावे असा सल्ला त्यांनी दिला. Agriculture students should embrace entrepreneurship

महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आनंवना मध्ये आले असता आपल्या महाविद्यालयाला भेट देण्याकरिता आवर्जून कृषी महाविद्यालयात गेले.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने विशेष मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले. संयोगाने हे वर्ष महाविद्यालयाचे हीरक महोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने तयार केलेल्या हीरक महोत्सवी चिन्हाचे तसेच मराठी व इंग्रजी मध्ये तयार केलेल्या महाविद्यालयाची माहिती देणाऱ्या घडी पत्रिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेणाऱ्या दालनाचे उद्घाटन करून ही भेट स्मरणीय होण्यासाठी त्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. Dr. Krishna Illa, Managing Director of Bharat Biotech and father of Covaxin Vaccine

महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रसंगी त्यांचे गुरुजन डॉ प्रभाकर शेलगावकर, डॉ तात्यासाहेब धानोरकर , श्री बळवंत चांदोरे तसेच तेलंगणा मधील त्यांच्यासोबतचे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विशेष करून उपस्थित होते.

अतिशय भावपूर्ण रित्या संपन्न अशा सोहळ्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने संवाद साधला . इथल्या कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यातूनच कदाचित मला संसर्गजन्य रोगाविरुद्ध अनेक लसी निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली असावी असे मत व्यक्त करीत श्रद्धेय बाबा आमटे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर आनंदवनातील संपन्न झालेल्या मुख्य कार्यक्रमात डॉ क्रिष्णा इल्ला यांनी 50 लाख रुपयांची देणगी संस्थेला देण्याचा मनोदय व्यक्त करून आपल्या दातृत्वाचा परिचय परत एकदा करून दिला. विशेष बाब म्हणजे कोरोना काळात जेंव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत होते तेंव्हा आनंदवन परिवारा करिता त्यांनी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन च्या 4000 मात्रा उपलब्ध करून एकप्रकारे गुरुदक्षिणा दिली होती.

महाविद्यालयातील गौरवपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार तर सूत्रसंचालन श्री राहुल तायडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular