Mahavitaran’s 21st Foundation Day celebrated simply
चंद्रपूर :- महावितरणच्या 21 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर परिमंडळाच्या वतीने ‘विद्युत भवन’ कार्यालयातील सभागृहामध्ये अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. Msedcl’s 21st Foundation Day celebrated
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. हरिश गजबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली. ‘अपघातमुक्त महावितरण’ Accident Free Msedcl हे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक स्तरावर सुरक्षिततेचे नियम पाळण्याचा आणि तांत्रिक बाबींमध्ये अधिक अचूकता आणण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. बहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ. अशोकभाऊ जीवतोडे
कार्यक्रमात शिपाई ते जनमित्र अभियंता व इतर कर्मचारी यांनी आपले कुटुंब सांभाळून कंपनीला सेवा देत असतांना जे चैतन्य दाखविले त्यामुळे चंद्रपूर परिमंडळाचा माहे -2026 मध्ये 104% महसुल जमा करण्यात यश आले. यासोबतच, कंपनीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि तांत्रिक कार्यक्षमता वाढवून व्यावसायिक स्तरावर महावितरणला अधिक बळकट करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. तसेच चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. मनोज धाबर्डे यांनी ‘ग्राहक सेवेत व कंपनीच्या प्रगतीत सर्व घटकांचे योगदान आहे. तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्राहक व कर्मचारी यांच्यात संवाद साधने आवश्यक आहे. असे मनोगत व्यक्त केले. अधीक्षक अभियंता (पा.आ.) चंद्रपूर परिमंडळ श्री. रमेश सानप यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्व अधिकारी कर्मचारी यांना आगामी काळात अधिक पारदर्शक गतिमान सेवा देण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मुंबई येथील मुख्य कार्यक्रमाचे थेट ऑनलाइन प्रक्षेपण होते. याद्वारे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी संपूर्ण राज्यभरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक (संचलन/प्रकल्प) सचिन तालेवार, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (वित्त) अनुदिप दिघे आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनीही आपले मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) असित ढाकणेकर, कार्यकारी अभियंता चंद्रपूर विभाग चंद्रशेखर दारव्हेकर, कार्यकारी अभियंता चाचणी विभाग योगेंद्र निचत, कार्यकारी अभियंता चंद्रपूर मंडळ विकास शहाडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरीवार, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) प्रशांत ठाकरे, वरिष्ठ व्यवस्थापक (मा.सं.) अविनाश आचार्य, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) नंदकुमार नरड, यांच्यासह अधिकारी, आभियंते व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक खामनकर सहाय्यक अभियंता यांनी केले.