Tuesday, March 25, 2025
HomeCrimeचंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे मनोरुग्ण महिलेवर अत्याचार

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे मनोरुग्ण महिलेवर अत्याचार

Video viral on social media by abusing a mentally ill woman
Five torture accused arrested by Nagbhid police

चंद्रपूर :- बसस्थानकावरील प्रसाधनगृहात मध्यरात्रीच्या सुमारास एका मनोरूग्ण महिलेवर अत्याचार करून सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या ठिकाणी आज शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी नागभिड पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. abusing a mentally ill woman

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास नागभीड पोलीस स्टेशन हद्दीत Social Media Whatsapp सोशल मिडीया (व्हॉटसॅअप) वर अत्याचाराचा अश्लील, आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाला होता. या प्रकरणाची माहिती नागभीड पोलीसांना झाली. त्यांनी तत्काळ व्हिडीओ मधील पिडीत महिलेची शोध घेवुन तिची ओळख पटविली. त्यानंतर व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पोलीस पथके तयार करण्यात आले. त्यानंतर लगेच आरोपींचा शोध घेण्यात आला. Five torture accused arrested by Nagbhid police

गुन्ह्यात सहभागी आरोपींना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. सोशल मिडीयावर व्हायरल व्हिडीओ मधील अत्याचार केल्याचे घटनास्थळ हे नागभीड बसस्थानकातील प्रसाधनगृह (मुत्रीघर) आहे.

12 ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास मनोरूग्ण महिलेस एकटी असल्याचे पाहुन तिला प्रसाधनगृहात नेऊन तिच्यावर एका आरोपीने अत्याचार केला तर दुसऱ्या आरोपीने त्या प्रसंगाचा व्हिडीओ तयार केला. या घटनेमध्ये अन्य आरोपींनी त्या महिलेवर अत्याचार करण्यास सहकार्य केल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेतील एका आरोपीने अत्याचाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ त्याचे एका मित्राला व्हॉटसअॅप वर पाठविला होता. त्याने तो व्हिडीओ वेगवेगळे लोकांना सोशल मिडीया (व्हॉटसअॅप) द्वारे पाठवुन वायरल केला.

आज अकरा दिवसानंतर नागभीड पोलिस स्टेशनच्या हद्दीत तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे लक्षात येताच नागभिड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. नागभीड पोलिस स्टेशन मध्ये आरोपी मोहिन उमर शेख ( वय 19), हरिनारायण सुनील मांढरे (वय 30), कार्तिक प्रमोद बनकर ( वय 24), कुणाल राजू पाठक (वय 19), सर्व रा. नागभीड मयूर मधुकर वंजारी (वय 18) रा. पवनी, यांचे विरोधात कलम 64 (2) (क), 70 (1), 87, 126 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 67, 67 (अ) माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर घटेनीच माहिती पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे देण्यात आली. त्यांनी नागभीड येथे भेट दिली.

पिडीत मनोरुग्ण महिलेस तातडीचे उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular