चंद्रपूर :- सृजन समाजाचा आधारस्तंभ हे वरिष्ठ नागरिक असतात. त्यांचे अनुभव हे भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनाच्या वाटचालीसाठी युवा वर्गांनी त्यांच्या मार्गदर्शनाचे अनुकरण केल्यास एक सद्विचारी समाज घडेल, परंतु वरिष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. वरिष्ठ नागरिकांना शुद्ध पर्यावरणाचा सहवास लाभावा, त्यांचे जीवनमान सुदृढ आरोग्यमय व्हावे हे सामाजिक उद्दिष्ट उराशी बाळगून येरुर येथे “वृद्ध पार्क” हि वरिष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी अभिनव अशा संकल्पनेची मुहूतमेढ होत असल्याचे प्रतिपादन धारिवाल इन्फ्रास्ट्रकचर लिमिटेड Dhariwal infrastructure चे प्लांट हेड देवेश कुमार यांनी केले. Senior Citizen Park
खासदारांचा सरप्राइज विजिट, वाहतूक सावळागोंधळ….
येरुर या गांवात धारिवाल इन्फ्रास्ट्रकचर लिमिटेड च्या वतीने ४ एकर सार्वजनिक क्षेत्र विकसित करून विविधांगी वृक्षांची लागवड करीत जेष्ठ नागरिकांसाठी वृद्ध पार्क ची निर्मिती होणार आहे, या पार्कच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. चंद्रपुरात गांजा तस्करी, 3 आंतरराज्यीय आरोपी जेरबंद
प्रसंगी मंचावर सरपंचा प्रियंका मडावी, उपसरपंचा सुनीता वडस्कर, माजी सभापती विजय बल्की, ग्रा. प. सदस्य रमेश बुच्चे, धारिवाल इन्फ्रास्ट्रकचर लिमिटेड चे उपमहाव्यवस्थापक दिनेश गाखर, अमोल गिरडकर, डॉ. अनिष नायर, रवी चावरे, देवाशिष रॉय, रवींद्र उपाध्याय यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, कारवाई करा अन्यथा आंदोलन – NSUI
पुढे बोलतांना देवेश कुमार यांनी पर्यावरणाचे महत्व विषद करतांना वृद्ध पार्क च्या सविस्तर आराखड्यासह, निर्मिती व संगोपनाची माहिती दिली. हा पार्क स्वच्छ, सुंदर, हरीत व सोयीयुक्त असेल यासाठी सर्व गावकऱ्यांनी व्यक्तिशः जबाबदारी स्वीकारावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पार्क मध्ये ८००० पेक्षा अधिक होणाऱ्या वृक्षारोपणामुळे परिसरातील हवा अधिक निरोगी होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केला. बोधिसत्व बुद्ध विहाराच्या संरक्षणासाठी आमरण उपोषण
यावेळी मंचावर उपस्थित सरपंच, उपसरपंच व मान्यवरांनी धारिवाल इन्फ्रास्ट्रकचर लिमिटेड च्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करीत उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य नामदेव बोरकुटे, देवराव कुमरे, गीताताई कळस्कर, मृणाली बरडे, सविता घागरगुडे, रूपल देशकर, सचिव बी. डब्लू. निकोडे, शामकला बरडे , केशव तुरारे, बंडू बीटे, प्रेम जोगी, सुनीता कासवटे, भास्कर पिंपळकर, मारोती वडस्कर, सुदाम पिदूरकर व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.
