चंद्रपूर :- लोकप्रतिनिधीच्या कार्याचा खरा परिणाम हा जनतेच्या मनात उमटलेल्या विश्वासातून दिसून येतो. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेत, समाजातील शेवटच्या घटकाच्या हिताची जाणीव ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या आ. सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांच्या विकासदृष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा, बल्लारपूर शहरचे महामंत्री श्री. अरविंद चुनबाद वर्मा यांनी ‘मन की बात’ Man Ki Baat कार्यक्रमात आ. मुनगंटीवार यांना त्यांच्या कार्याचा गौरव करणारी विशेष काव्यरूप फ्रेम भेट दिली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांचे सार्वजनिक जीवन हे विकास आणि संवेदनशीलतेच्या सुंदर संगमाचे उदाहरण आहे. अर्थमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी पर्यावरण संवर्धनाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देत ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प साकारला. या अभूतपूर्व उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. विकास करताना भविष्यातील पिढ्यांचा विचार करणारी त्यांची ही दूरदृष्टी आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यातील संवेदनशीलता अधोरेखित करणारी आहे.
आरोग्य क्षेत्रातही आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी आणि आरोग्य सुविधा जनसामान्यांच्या अधिक जवळ नेण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांनाही उत्तम आरोग्यसेवा मिळावी, हा त्यांच्या विकासदृष्टीतील मानवी चेहरा आहे. त्याचप्रमाणे शिक्षण, महिला सक्षमीकरण, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विविध जनकल्याणकारी उपक्रमांना त्यांनी सातत्याने प्राधान्य दिले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी विकास म्हणजे केवळ भौतिक प्रगती नव्हे; तर माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे होय. म्हणूनच त्यांच्या कामात कधी पर्यावरणाची काळजी दिसते, कधी सामान्य रुग्णाच्या आरोग्याची चिंता दिसते, कधी मुलांच्या शिक्षणाची आस्था दिसते, तर कधी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठीची तळमळ जाणवते.श्री. अरविंद चुनबाद वर्मा यांनी दिलेल्या या फ्रेममध्येही याच भावनेचे प्रतिबिंब उमटले आहे. “यह साधारण केवल नाम नही, किसी कुर्सी के मोहताज नहीं…” अशा शब्दांत त्यांनी आ. मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्याचे केलेले काव्यात्मक वर्णन हे एका कार्यकर्त्याच्या मनातील कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणारे ठरले.
विकासासाठी असलेली तळमळ, जनतेच्या सुख-दुःखाची जाण आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दूरदृष्टी यामुळेच आ. सुधीर मुनगंटीवार हे विकासाला संवेदनशीलतेची दिशा देणारे नेतृत्व म्हणून जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ठरले आहेत. त्यांच्याप्रती व्यक्त करण्यात आलेली ही भेट म्हणजे त्यांच्या कार्याला मिळालेली एका नागरिकाच्या हृदयातून उमटलेली कृतज्ञतेची पावती आहे.