चंद्रपूर :- सुधीर भाऊ मुनगंटीवार मित्र परिवार, जलनगर यांच्या वतीने जश्ने ईद-उल-नबी निमित्त जलनगर येथे नाते शरीफ कार्यक्रम उत्साहात पार पडला. Eid E Milad
या कार्यक्रमात जलनगर परिसरातील लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीता खांडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोन क्रमांक 3 चे सभापती तथा नगरसेवक रवी लोणकर होते. यावेळी महानगरपालिकेच्या सभागृह नेत्या जयश्री जुमडे, नगरसेविका सुनीता जयस्वाल, डॉ. जावेद पठाण, डॉ. इमरान शिवजी, अहमद खान पठाण, नम्रता आचार्य-ठेमस्कर, उमेश आष्टनकर आणि दिनेश मंडल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिना शेख यांनी केले. यावेळी महापौर संगीता खांडेकर यांनी ईद-उल-नबीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. इमरान शिवजी, अहमद खान पठाण, नम्रता आचार्य-ठेमस्कर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून रवी लोणकर यांनीही उपस्थितांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले.
नाते शरीफ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फिरदोज अंजुम शेख, मेहेर फातिमा सय्यद आणि फहरी सब्बीन खान यांना उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक शहातूर पठाण आणि माजी नगरसेविका शीतल आत्राम यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिस्ता फारुकी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेविका शीतल आत्राम, नाझीरा सय्यद, माला माणिकपुरी, जयश्री आत्राम, सीमा धुर्वे, लता बारापात्रे आणि नदीम शेख यांनी परिश्रम घेतले.
