चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात नव्याने दाखल झालेल्या ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचा लोकार्पण सोहळा आज, १७ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यवर्ती बस स्थानक, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला. खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या शुभहस्ते या बसेस प्रवाशांच्या सेवेत देण्यात आल्या. Launch of the ‘Rajmata Jijau’ bus service
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे लोकार्पणानंतर उपस्थित सर्व नगरसेवक, एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये बसून आनंदात एक फेरफटका मारला आणि बसच्या आधुनिक सुविधांची प्रत्यक्ष अनुभव घेत पाहणी केली.
गेल्या ७८ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांचा विश्वास संपादन करून महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ म्हणून नावारूपाला आले आहे. प्रवाशांची गरज आणि सोयीच्या दृष्टीने एसटी महामंडळाने वेळोवेळी बदल करून नवनवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार परिवर्तन करून दाखल करण्यात आलेल्या या नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. Travel to become easier for farmers, students, and the working class
या प्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, एसटी महामंडळ ही महाराष्ट्राची खरी लोकवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा तो मुख्य आधार आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर आगारास ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस प्राप्त होणे ही चंद्रपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या आधुनिक बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील.
यावेळी त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, चंद्रपूर जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यात आणखी नवीन बसेस वाढवण्यात याव्यात, अशी मागणी आपण एसटी महामंडळ व शासनाकडे करणार आहोत. त्याचसोबत बस स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहांपर्यंतच्या सर्व मूलभूत सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या, एसटी सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला उत्तम व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर आणि कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या सोहळ्यास विभागीय नियंत्रक अशोक वाडीभस्मे, सह विभागीय नियंत्रक दिवसे, आगर प्रमुख हेमंत गोवर्धन, काँग्रेस गटनेते नगरसेवक सुरेंद्र अडबाले, महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर, महिला व बालकल्याण उपसभापती सईदा बेगम ताजु शेख, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक सुनील खंडेलवार, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक विनोद लभाणे, नरसेवक आकाश मानकर, नगरसेविका महानंदा वाळके, नगरसेविका वैशाली महाडूळे, नगरसेविका करुणा चालखुरे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, अजय महाडूळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
