भद्रावती :- हेल्पिंग हँड्स मल्टिपर्पज सोसायटी, भद्रावती या सामाजिक संस्थेच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या ‘सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२६’ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ रविवारी (दि. १५ ऑगस्ट) उत्साहात पार पडला. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत आयोजित या स्पर्धेत वर्ग ५ ते १० मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. Azadi Ka Amrit Mahotsav’ organized by Helping Hands >> चंद्रपूर पोलिसांची दमदार कारवाई – 3 कोटी 59 लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन…..
स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गट अ (वर्ग ५ ते ६) मध्ये प्रथम क्रमांक यदक्षी प्रधान, द्वितीय ओवी पेंटर तर तृतीय क्रमांक आराध्या राठोड हिने पटकावला. या गटातील विजेत्यांना प्रा. संगीता बावडे मॅडम यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. Meritorious students felicitated
भद्रावती शहरातील बाळासाहेब ठाकरे गेट चौकात अखेर ट्राफिक सिग्नल….
गट ब (वर्ग ७ ते ८) मध्ये प्रथम क्रमांक यश सातार, द्वितीय शौर्य दुधलकर तर तृतीय क्रमांक राजन्या दास हिने मिळविला. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास प्रा. प्रणय कांबळे व राजकन्या पेटकर यांच्या वतीने, द्वितीय क्रमांकास पनवेल शेंडे यांच्या वतीने, तर तृतीय क्रमांकास ‘प्लाय अॅकॅडमी भद्रावती’ यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले.
गट क (वर्ग ९ ते १०) मध्ये प्रथम क्रमांक कल्पक पाटील, द्वितीय अमित नळे तर तृतीय क्रमांक विधी करमरकर हिने पटकावला.
या गटातील विजेत्यांना रितेश प्रकाश (भद्रावती) – हेम मेकॅनिक, एन एम डी सी लिमिटेड यांच्या वतीने रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
याशिवाय विशेष प्रोत्साहन म्हणून तिन्ही गटांतील तीन – तीन विद्यार्थ्यांना कुशल मेश्राम व डॉ. अमित नगराळे यांच्या वतीने बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
‘डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूल, भद्रावती’ येथे सकाळी झालेला हा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासोबत आयोजित करण्यात आला होता. हेल्पिंग हँड्स NGO टीमच्या वतीने या सत्कार समारंभास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणाऱ्या सर्व मान्यवर, पालक व नागरिकांचे आभार मानण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना देण्यासोबतच त्यांच्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
